Congress Maha Rally in Jaipur | हिंदूत्ववाद्यांची सत्ता उलथवून देशात हिंदूंचे राज्य आणू या – Rahul Gandhi

Congress Maha Rally in Jaipur Rajasthan, राजस्थान, वृत्तसंस्था :  हिंदू सत्यासाठी मरतो. त्याचा जीवन प्रवास हा सत्याच्या शोधासाठी असतो.हिंदुत्ववाद्यांना सत्याशी काहीही घेणदेणं नाही. सत्याच्या शोधाकरिता हिंदू कधीच झुकत नाही; पण हिंदूत्ववादी द्वेषाने भरलेले असतात ते समोरून वार न करता पाठीमागून वार करतात कारण, त्याच्या मनात भीती असते”, अशी घणाघाती टिका काॅंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi Jaypur Speech) यांनी व्यक्त केले.

देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस पक्षाने जयपूरमध्ये ‘महंगाई हटाओ’ महारॅलीचं रविवारी आयोजन केलं होतं. या रॅलीमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. या रॅलीला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.जयपूरच्या विद्यानगर स्टेडियममध्ये या रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं.

२०१४ मध्ये हिंदुत्वावादी सत्तेत आले. पण हिंदू आजही सत्तेपासून दूर आहेत. आपल्याला या हिंदुत्ववाद्यांना हटवून हिंदूंना सत्तेत आणायचे आहे. तुम्ही सर्वजण हिंदू आहात. हिंदुत्ववादी सत्तेचे भुकेलेले आहेत. हिंदुत्त्ववाद्यांचा सत्याच्या मार्गाशी काहीही संबंध नाही. हिंदू सत्याच्या शोधात कधीच झुकत नाही.परंतु हिंदुत्ववादी द्वेषाने पछाडलेले आहे. देशात पुन्हा एकदा हिंदुंची सत्ता आणा. असं आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे.

जो हिंदुत्ववादी असतो तो कोणत्याच धर्माला जुमानत नाही. तो फक्त हिंसेवर विश्वास ठेवतो. हिंदू आणि हिंदुत्ववादी या दोन शब्दांची आत्मा एक सारखी असूच शकत नाही. मी हिंदू आहे आणि अहिंसेवर विश्वास ठेवतो. महात्मा गांधी हिंदू होते आणि गोडसे हिंदुत्ववादी होते. केंद्र सरकार हिंदुत्ववादी आहे. ज्यांचे काम फक्त ऐकमेकांना मारणे आहे. सत्तेसाठी हे लोकं काहीही करू शकतात. असं राहुल गांधी म्हणाले.

हिंदुत्ववादी हे केवळ सत्तेसाठी आग्रही असतात. त्यांना सत्याशी काही देणेघेणे नाही. आम्ही हिंदू आहोत आणि ‘ते’ हिंदुत्ववादी आहेत, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर टीकेची झोड उठवली.

हिंदू कोण असतो? जो सर्व धर्मांचा आदर करतो; कोणालाही धमकावत नाही; तो हिंदू असतो. सध्या सत्तेत असणारे भोंदू हिंदू आहेत. भारतात हिंदूंचे राज्य नाही तर हिंदुत्ववाद्यांचे राज्य आहे. आपल्याला देशात हिंदुत्ववाद्यांना सत्तेवरून हटवायचे आहे आणि हिंदू राज्य निर्माण करायचे आहे, असेही राहुल यांनी नमूद केले.

प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल

एलपीजी सिलिंडरची किंमत सुमारे १ हजार रुपये आहे, मोहरीच्या तेलाची किंमत २०० रुपये प्रति लीटर आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. असे प्रियांका गांधी म्हणाल्या. सामान्य जनतेचा आवाज  कोणीही ऐकत नाहीये. महागाई विरोधात प्रियांका गांधी (Priyanka Gandhi Jaypur Speech) यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकार जनतेसाठी काम करत नसून केवळ निवडक उद्योगपतींसाठी काम करत आहे. केंद्र सरकार हे लबाड आणि लुटमारीचे सरकार आहे. पीएम मोदी पर्यटनात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांकडे जाण्यासाठी वेळ मिळत नाहीये अशी टीका प्रियंका गांधींनी केली.