Breaking News: मराठवाड्यात मोठा राजकीय भूकंप, राष्ट्रवादीकडून आमदारकी लढलेल्या मोठ्या नेत्याचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, अजित पवार गटाला मोठा धक्का !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Datta Gorde Paithan : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात रोज कुठे ना कुठे राजकीय भूकंप होत आहेत. मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाला अश्याच एका राजकीय भूकंपाचा (political earthquake) जोरदार हादरा बसला आहे. मराठवाड्यातील एका मोठ्या नेत्याने (datta gorde) माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून (NCP) आमदारकी लढवलेल्या या नेत्याने शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केल्याने छत्रपती संभाजीनगरसह (Sambhaji Nagar) मराठवाड्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.

Breaking News, big political earthquake in Marathwada, NCP Big leader Datta Gorde join Shiv Sena UBT, big blow to Ajit Pawar's group!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मंगळवारचा दिवस राजकीय भूकंपाने गाजला. संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील राष्ट्रवादी (अजित पवार) चे नेते दत्ता गोर्डे (Datta Gorde) यांनी आपल्या समर्थकांसह माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शिवसेनेत प्रवेश केला. आज दुपारी हा पक्षप्रवेश सोहळा मातोश्रीवर पार पडला. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दत्ता गोर्डे यांनी राष्ट्रवादीची साथ सोडल्याने अजित पवार गटाला मराठवाड्यात मोठा धक्का बसला आहे.

दत्ता गोर्डे यांनी 2019 ला राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणुक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. गोर्डे हे अतिशय आक्रमक राजकीय नेतृत्व म्हणून संपुर्ण संभाजीनगर जिल्ह्यात ओळखले जात. त्यांनी आज मंगळवारी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवबंधन हाती बांधले.गोर्डे यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरु झाला होता. आता ते पुन्हा एकदा स्वगृही परतले आहेत.

Breaking News, big political earthquake in Marathwada, NCP Big leader Datta Gorde join Shiv Sena UBT, big blow to Ajit Pawar's group!

पैठण तालुक्यातील आक्रमक कार्यकर्ते म्हणुन ओळख असलेले दत्ता गोर्डे यांनी आज अजित पवारांची साथ सोडून ठाकरे गटात प्रवेश केला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेले दत्ता गोर्डे पूर्वी शिवसेनेतच होते. त्यामुळे, आता पुन्हा ते स्वगृही परत आले असून, शिवबंधन हाती बांधले आहे. सोबतच ठाकरे गटाकडून ते आगामी विधानसभा निवडणुक लढणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या प्रवेश सोहळ्याच्या वेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील उपस्थित होते.

कधीकाळी संदिपान भुमरेंचे विश्वासू…

दत्ता गोर्डे हे मूळचे शिवसेनेचे कार्यकर्ते. तसेच शिंदे गटाचे मंत्री तथा पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदिपान भुमरे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. भुमरे यांनी त्यांना पैठण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष केले होते. मात्र, पुढे दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि गोर्डे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर ते काही काळ भाजपमध्ये राहिले. पुढे त्यांनी 2019 साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक ही लढवली. 13 हजारच्या मताधिक्याने त्यांचा पराभव झाला. परंतु यावेळी ते 69 हजार 924 मतदान घेऊन ते दुसर्या क्रमांकाचे उमदेवार ठरले. मात्र, अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने हा मतदारसंघ शिंदे गटाकडे जाणार असल्याचे लक्षात येताच गोर्डे यांनी आता ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

दत्ता गोर्डे यांचा राजकीय प्रवास…

गोर्डे यांनी मागील पंधरा वर्षांत नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्षपर्यंतचा राजकीय प्रवास केला आहे. मध्यंतरी ते भाजपमध्येही होते. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर ते काही दिवस अजित पवार यांच्या गटातही होते. ते आक्रमक आणि जनतेच्या संपर्कातील कार्यकर्ते आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत पैठण विधानसभा मतदारसंघातून त्यांना ठाकरे गट उमेदवारी देऊ शकतो अशीही चर्चा आहे.

शितल कलेक्शन जामखेड