अहमदनगर: म्हणून आमदार प्रा राम शिंदे यांच्या आश्रूंचा बांध फुटला…! नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। राज्याचे माजी मंत्री तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रा राम शिंदे यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार राम शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार अहमदनगरमध्ये पार पडला. या कार्यक्रमात माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी आमदार प्रा राम शिंदे यांचा जीवनपट अन राजकीय कारकीर्दीवर सविस्तर भाष्य केले. हाच धागा पकडून आमदार प्रा राम शिंदे यांनी भाषण केले. या भाषणात शिंदे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आपल्या भावनिक भाषणात शिंदे यांच्या आश्रूंचा बांध फुटला होता. यामुळे संपूर्ण सभागृह भावूक झाले होते.

Therefore, MLA Prof. Ram Shinde's tears burst, Ram Shinde latest news

पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाल्यापासुन आमदार प्रा राम शिंदे यांचे जिल्हा संघटनेवर वर्चस्व आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये विविध खात्यांचे कॅबिनेट मंत्रीपदासह जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आमदार राम शिंदे यांनी काम केले. मंत्रीपदाच्या काळात त्यांनी जिल्ह्यासह मतदारसंघात भरीव निधी खेचून आणला होता. मंत्रिपदाच्या काळात जिल्हाभरातील नेते आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम त्यांनी केले होते. मात्र 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. अश्याही परिस्थितीत जिल्हा भाजप त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी होती. भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी गेली अडीच तीन वर्षे आमदार राम शिंदे यांच्याच नेतृत्वात जिल्हात भाजपची वाटचाल सुरू ठेवली होती.

Therefore, MLA Prof. Ram Shinde's tears burst, Ram Shinde latest news

दरम्यान मध्यंतरीच्या काळात पक्षाने आणि नेतृत्वाने आमदार राम शिंदे यांना प्रदेश उपाध्यक्ष केले, त्यानंतर राज्यसभेच्या खासदारकीसाठी त्यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते पण त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली. त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून पक्षाने जबाबदारी सोपवली. याशिवाय पक्षाने त्यांच्या खांद्यावर नुकतीच प्रवक्तेपदाची धुरा सोपवली आहे. त्याआधी भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी राम शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. भाजपात कुठल्याही पदासाठी संधी कोणाला द्यायची अशी जेव्हा चर्चा सुरू होते तेव्हा आमदार राम शिंदे यांचे नाव नेहमी चर्चेत राहते, यावरून पक्ष संघटनेत आणि नेतृत्वाच्या गुडबूकमध्ये शिंदे यांचे असलेले राजकीय वजन अधोरेखित होत आहे.

Therefore, MLA Prof. Ram Shinde's tears burst, Ram Shinde latest news

आमदार राम शिंदे यांची प्रदेश प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा अहमदनगर जिल्हा भाजपने भव्य सत्कार केला. या सत्कार सोहळ्यात माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी आमदार राम शिंदे यांच्या राजकीय कारकीर्दीवर प्रकाश टाकला, याच भाषणाचा धागा पकडून आमदार शिंदे म्हणाले की,आजच्या सत्कार सोहळ्यात कर्डीले साहेबांनी माझा सर्व जीवनपट आणि कारकिर्द सांगण्याचा प्रयत्न केला, एकुणच ही सगळी कारकिर्द पाहत असताना, एका छोट्या गावातला असताना पाच वर्षे जिल्ह्याचा पालकमंत्री  राहिलो, परंतू संघटना एखाद्या व्यक्तीला काय करू शकते म्हणजे राजकीय पद आणि संघटनेतलं पद दोन्ही पदातील समांतर आलेख उंचावला, आजवरच्या कारकिर्दीत कधीच वाद विवाद झाला नाही, राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून देखील काम करत असताना कधीही मिडीयावरती आणि सामाजिक जीवनामध्ये दिलगीरी व्यक्त करायची आजपर्यंत वेळ आली नाही,जे करायचं ते नीटनेटकं, व्यवस्थित, पारदर्शक करायची भूमिका संघटनात्मक असो किंवा राजकीय असो ती आजवर घेतली. कोणताही निर्णय घ्यायचाय तो अभ्यासपूर्वक घेतला, असे शिंदे म्हणाले.

आमदार प्रा राम शिंदे पुढे म्हणाले की, काम चांगलं केल्यावर निवडून येताच येते असं नाही, कर्डिलेंचा पराभव झाला तसा माझाही पराभव झाला, काम चांगलं करून जिंकताच असं नाही, कोणाचा आदर्श घेऊन जिंकता असंही नाही, कोणतंही पुस्तक वाचून त्याची काॅपी करून आपल्याला जिंकता येतं असंही नाही, मात्र गेल्या अडीच तीन वर्षांत जिल्हाभरातील कार्यकर्त्यांनी भरभरून प्रेम दिलं,पराभव झालेला असतानाही कार्यकर्त्यांनी नेतृत्वाची संधी दिली. याची पक्षाने आणि नेतृत्वाने दखल घेतली. म्हणून समांतर असं पद मिळालं, हे पद मिळाल्यानंतर खर्या अर्थाने न्याय द्यायची भूमिका घेतली, असे सांगताच आमदार राम शिंदे भावूक झाले होते.

भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर जेव्हा अन्याय आणि अत्याचार होतो. त्यावेळेस अस्वस्थ होतो, कारण त्यांनी गेली अनेक वर्षे खस्ता खाल्ल्या, संघर्ष केला, परिश्रम घेतले, रस्त्यावर उतरून अंदोलन केले, पक्षाची विचारधारा शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचं काम केलं, अश्याच नेतृत्वासाठी मी आमदार झालो, असे सांगताच आमदार राम शिंदे यांच्या आश्रूंचा बांध फुटला.

जे कोणतं पद असेल, जी कोणती भूमिका असेल, येणाऱ्या कालखंडात भविष्यात अतिशय प्रभावीपणे राबवण्यासाठी, पक्षाचा विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही आमदार राम शिंदे यांनी उपस्थितांना दिली.

भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता रणांगणातून पळून गेला तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असूच शकतं नाही.कितीही उन्हातान्हात असो किंवा काळ्या पाषणाला धडक देणं असो त्याला पार करणं हेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं काम आहे. हिच प्रेरणा आणि हिच दिशा घेऊन येणाऱ्या कालखंडात संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्य भारतीय जनता पार्टीमय करायचा आहे, असा निर्धार यावेळी आमदार राम शिंदे यांनी बोलून दाखवला.

आमदार राम शिंदे पुढे म्हणाले की,अहमदनगर जिल्हा लोकसंख्या आणि आकारमानाने मोठा आहे.त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण येतो, जनतेची कामे वेळेवर होत नाहीत त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे ही आपली पूर्वीही भूमिका होती आणि आजही आहे आणि त्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील. मी पालकमंत्री असल्यापासून जिल्हा विभाजनाची भूमिका घेतलेली आहे आणि आजही त्या भूमिकेवर कायम आहे.

चार- चार आमदार असणाऱ्या कोकणातील जिल्ह्यांना स्वतंत्र अधिकारी आहेत पण अहमदनगर जिल्हा लोकसंख्या आणि आकाराने सर्वात मोठा आहे.जिल्ह्यात दोन खासदार आहेत. त्यामुळे प्रशासनावर कामाचा फार मोठा ताण येतो परिणामी जनतेची कामे वेळेवर होत नाहीत.त्यामुळे जिल्हा विभाजन झालेच पाहिजे.याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण अनुकूल आहेत. विभाजनासाठी सर्व प्रयत्न केले जातील. असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, 27 फेब्रुवारी पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणारच आहे.जिल्ह्याला प्रत्येक मंत्रिमंडळ मध्ये आजवर 3 मंत्री पदे मिळत आली आहेत. तीन नाही तर किमान दोन तरी मंत्री जिल्ह्याला मिळतील यासाठी आपण प्रयत्न करू, मी मतदार संघात खूप कामे केली,पुस्तक वाचून, कोणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, कॉपी करून आमदार होता येत नाही.पण कार्यकर्त्यांच्या प्रेमाने पुन्हा आमदार झालो.खर तर राज्यसभेचा खासदार होता होता विधानपरिषद आमदार झालो असे सांगताना ते भावुक झाले होते.

आमदार राम शिंदे यांना कॅबिनेट मंत्री पद मिळावे असा ठराव माजी आमदार कर्डीले यांनी मांडला त्यास सर्व उपस्थितांनी हात उंचावून मंजुरी दिली.त्यावेळी बोलताना कर्डीले म्हणाले की आता तुम्ही पक्षाचे प्रवक्ते झाले आहात पुढे कॅबिनेट मंत्री पण होताल, पण आता जिल्हयाकडे लक्ष द्या पूर्वी  सारखे फक्त बारामती ,बारामती करू नका, बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये  जिल्हयातील कार्यकर्त्यांना ताकद द्या, अशी मागणी माजी आमदार कर्डीले यांनी आमदार राम शिंदे यांच्याकडे केली.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा पाचपुते, मिलिंद गंधे,अश्विनी थोरात, सुजित झावरे, सुरेश सुंभे,मनोज कोकाटे, अभिलाष घिगे,विलास शिंदे,रेवणनाथ चोभे,संतोष म्हस्के, दिलीप भालसिंग, दीपक कार्ले,भाऊसाहेब बोठे, अशोक झरेकर, रवि सुरवसे, सचिन पोटरे, शेखर खरमरे सह आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.