जामखेडमध्ये भाजपच्या तिरंगा बाईक रॅलीला जोरदार प्रतिसाद

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तालुका भाजपच्या वतीने शनिवारी जामखेड शहरात भव्य दिव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला जोरदार प्रतिसाद मिळाला. (Strong response to BJP’s tiranga bike rally in Jamkhed)

Strong response to BJP's tiranga bike rally in Jamkhed

जामखेड तालुका भाजपच्या वतीने आज जामखेड शहरात तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीची सुरुवात करमाळा चौकातून झाली. रॅलीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. करमाळा चौक  ते कर्जत रोड या मार्गावर तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली होती. रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

ही रॅली करमाळा चौक – मेनपेठ – बीड रोड – नागेश विद्यालय – मिलींद नगर – तपनेश्वर  – खर्डा चौक – नगर रोड – कर्जत रोड या भागातून गेली. जामखेड शहरवासियांनी रॅलीचे जोरदार स्वागत केले. संपूर्ण शहरात तिरंगामय वातावरण तयार झाले होते. भाजपा कार्यकर्त्यांनी देशभक्तीपर घोषणांनी शहर दणाणून सोडले.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अजय काशिद, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, पंचायत समिती सदस्य डाॅ भगवान मुरूमकर, रविंद्र सुरवसे, पांडुरंग उबाळे, सोमनाथ पाचरणे, मनोज कुलकर्णी, अमित चिंतामणी, सोमनाथ राळेभात, बाळासाहेब गोपाळघरे, प्रविण चोरडीया, तुषार पवार, मकरंद काशिद, ॲड बंकटराव बारवकर, उदय पवार, उध्दव हुलगुंडे सह आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीमुळे संपूर्ण शहराचे वातावरण तिरंगामय झाले होते.