धक्कादायक: भाजपा नेत्याची आत्महत्या, बीड जिल्ह्यात उडाली मोठी खळबळ

जामखेड टाइम्स वृत्तसेवा  : बीडच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंगळवारी बीड शहरातील एका भाजपा नेत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Shocking,BJP leader's suicide, big excitement in Beed district, Beed BJP city president Bhagirath Biyani's suicide

भाजपचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वतःवर गोळी झाटत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. ही घटना बियाणी यांच्या राहत्या घरी घडली. भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरी स्वतःच्या बंदुकीतून गोळी झाडत आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. 

बियाणी यांनी स्वता:वर गोळी झाडून घेतल्यानंतर  त्यांना उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतू  उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.  भगीरथ बियाणी हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर होते. त्यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

बीड भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी टोकाचे पाऊल का उचलले असेल याचा बीड पोलिसांनी शोध सुरू केला आहे. दरम्यान बियाणी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेचा बीड पोलीस वेगाने तपास करत आहेत 

(सविस्तर बातमी लवकरच)