कर्जत जामखेडच्या राजकारणात मोठा उलटफेर, रोहित पवारांच्या एकाधिकारशाहीला बसला जोरदार तडाखा, प्रा मधुकर राळेभात यांनी ठोकला राष्ट्रवादीला रामराम !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । कर्जत जामखेडमधील स्वाभिमानी नेते व कार्यकर्त्यांनी रोहित पवारांच्या एकाधिकारशाही, हुकुमशाही व मनमानी कारभाराविरोधात बंडाचे निशाण फडकावण्यास सुरुवात केली आहे.त्याचा पहिला मोठा स्फोट रविवारी जामखेडमध्ये (Karjat Jamkhed) झाला. सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांना (Rohit Pawar) आमदार करण्यासाठी जीवाचे रान केलेल्या एका जेष्ठ नेत्याने पक्षाला रामराम ठोकण्याची घोषणा केली आहे. (Madhukar Ralebhat News)

Big change in politics of Karjat Jamkhed, dictatorship of Rohit Pawar was dealt heavy blow, Prof. Madhukar Ralebhat left the NCP party, madhukar ralebhat news,

जेष्ठ नेते तथा राष्ट्रवादीचे विधानसभा प्रमुख प्रा मधुकर (आबा) राळेभात (Madhukar Ralebhat Jamkhed) यांनी आमदार रोहित पवारांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून पक्ष (NCP-SP) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. राळेभात यांच्या या निर्णयामुळे रोहित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राळेभात यांनी पत्रकार परिषद (Madhukar Ralebhat Press Conference) घेत पक्ष सोडत असल्याची मोठी घोषणा केली. पत्रकार परिषदेत प्रा राळेभात यांनी रोहित पवारांवर अनेक गंभीर आरोप करत जोरदार हल्ला चढवला आहे.

Big change in politics of Karjat Jamkhed, dictatorship of Rohit Pawar was dealt heavy blow, Prof. Madhukar Ralebhat left the NCP party, madhukar ralebhat news,

जामखेडच्या राजकारणात रविवारी मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत पक्ष सोडण्याची मोठी घोषणा केली. यावेळी बोलताना राळेभात म्हणाले की, मागील विधानसभा निवडणुकीत देशाचे नेते शरद पवार यांचा आदर ठेवून आम्ही रोहित पवार यांना निवडून आणले.परंतु गेल्या साडेचार वर्षामध्ये आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस हा पक्ष न ठेवता बारामती ॲग्रो लिमिटेडच्या कामगारांसारखी सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना वागणूक दिली असा गंभीर आरोप यावेळी राळेभात यांनी केला. यावेळी नगरसेवक अमित जाधव, मोहन पवार, राष्ट्रवादी खर्डा शहराध्यक्ष महालिंग कोरे, राजेंद्र वारे सह आदी उपस्थित होते.

कोणत्याही कार्यकर्त्याचा सन्मान ठेवला नाही. सतत अपमानकारक वागणूक दिली. एकाधिकारशाहीने कारभार केला. याचा आम्हा स्वाभिमानी कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास झाला. जनतेची कामे होत नव्हती. जनतेच्या कामासाठी त्यांच्या पीएंना फोन केला तर ते फोन उचलत नव्हते. स्वता: रोहित पवारांचे मतदारसंघाकडे दुर्लक्ष व्हायचे. हम करे सो कायदा या प्रमाणे त्यांचा कारभार असायचा. ज्या अपेक्षेने आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले ते सर्व फेल ठरलं. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात रोहित पवार अपयशी ठरले.शासकीय कार्यालये बांधून विकासाचा देखावा उभा केला. पण जनतेचे मुलभूत प्रश्न सोडविण्यात ते अपयशी ठरले. पाच वर्षांत कुकडीचे पाणी त्यांना आणता आले नाही, असा जोरदार हल्लाबोल यावेळी प्रा राळेभात यांनी केला.

madhukar ralebhat
madhukar ralebhat news

पुढे बोलताना राळेभात म्हणाले की, आता मी मोकळा झालो आहे. आता माझ्यात भिमसैनिक, शिवसैनिक, जनसैनिक संचारलाय. आता मी माझ्या तालुक्यातील माझ्या सर्व कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहे. प्रत्येकाला भेटणार आहे. 15 सप्टेंबर पर्यंत सर्वांशी चर्चा विनियम करणार आहे. ते सांगतील त्याप्रमाणे मी माझी पुढची दिशा ठरवणार आहे. मी विधानसभेला उभा राहिल का याची गॅरंटी नाही. परंतू एखाद्या पक्षाने मला जर पुढं केलं आणि मला तिकीट दिलं तर मी उभा राहू शकतो, परंतू मी अपक्ष उभा राहणार नाही, रोहित पवारांविरोधात जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवारांला मी मदत करणार असेही यावेळी राळेभात यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Big change in politics of Karjat Jamkhed, dictatorship of Rohit Pawar was dealt heavy blow, Prof. Madhukar Ralebhat left the NCP party, madhukar ralebhat news,

प्रा राळेभात पुढे म्हणाले की, आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षात आपल्याला किंमत दिली जात नाही. सिनियर असो, ज्युनियर असो त्यांना सन्मान दिला जात नाही. त्यामुळे सर्व कार्यकर्ते व जेष्ठ नेते नाराज आहेत.त्यामुळे उठाव करावा अशी सर्व कार्यकर्त्यांची भावना होती. त्यामुळेच मी पक्षाला आज सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित पवारांनी स्वपक्षातील नेत्यांचा अवमान करण्याबरोबरच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांतील नेत्यांचाही वारंवार अवमान केला. त्यांना कधीही विचारात घेतलं नाही, त्यांना साधे कार्यक्रमाला कधीही सन्मानाने बोलवलं नाही, मतदारसंघात गेल्या 25 ते 30 वर्षांपासून ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी अहोरात्र काम केले त्यांचाही त्यांनी कधी सन्मान राखला नाही. उलट काही कार्यकर्त्यांना सातत्याने वेगवेगळ्या मार्गाने भयभीत केले जाते. हुकुमशाही पध्दतीने कार्यकर्त्यांवर नजर ठेवली जाते. कोणीही विरोधात बोलू नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात असे सांगत, राळेभात यांनी रोहित पवारांच्या मनमानी कारभाराचे वाभाडे काढले.