Kirit Somaiya left for Kolhapur | ठाकरे सरकार झुकले; किरीट सोमय्या कोल्हापूरच्या दिशेने रवाना

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । हसन मुश्रीफ (Hasan mushrif) यांचा घोटाळा दाबण्यासाठीच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला अटक करण्याचे आदेश दिले आहेत, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी केला होता. सोमय्यांना स्थानबध्द करण्यावरून भाजप नेते प्रचंड आक्रमक झाले होते. ट्विटरवरून भाजपच्या नेत्यांनी सरकारला धारेवर धरत जोरदार हल्लाबोल केला होता.अखेर ठाकरे सरकार ( thackaray Government) झुकले आणि सोमय्या यांच्या घरासमोरील पोलिस बंदोबस्त हटवण्यात आला आहे.Kirit Somaiya left for Kolhapur

भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी कोल्हापूरला (kolhapur) जाणार अशी घोषणा केली असता मुंबई पोलिसांनी (Mumbai police) त्यांना स्थानबद्ध केलं होतं. संध्याकाळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त सोमय्यांच्या घराबाहेर लावण्यात आला होता. पण, अखेर तो आता हटवण्यात आला आहे.कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्या यांना नोटीस बजावली होती. Kirit Somaiya left for Kolhapur

त्याचबरोबर कोल्हापूर पोलिसांनी (kolhapur police) सुद्धा सोमय्यांना कोल्हापूरमध्ये न येण्यास सूचना केली होती.पण, सोमय्या कोल्हापूरला जाण्यावर ठाम होते. त्यामुळे संध्याकाळी 5.30 वाजेच्या सुमारास मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्यांना घरीच स्थानबद्ध केलं होतं. किरीट सोमय्यांना स्थानबद्ध केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. भाजपच्या नेत्यांनी जोरदार आक्षेप घेतल्यानंतर सोमय्यांच्या घराबाहेरील पोलिसांचा बंदोबस्त दोन तासांनंतर हटवण्यात आला आहे.Kirit Somaiya left for Kolhapur

Kirit Somaiya left for Kolhapur

माझा कोल्हापूर दौरा थांबविण्यासाठी आणि हसन मुश्रीफ घोटाळा दाबण्यासाठी मला मुलुंडच्या माझा घरातून अटक करण्याचे आदेश  महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे, असा आरोपच सोमय्यांनी केला होता. ”मला गणपती विसर्जनाला जाऊ दिले जात नाही, मी आज संध्याकाळी महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला जाणार आहे, कागलमधील मुश्रीफ यांच्या गैरव्यवहाराचा भांडाफोड केल्यानंतरच परत येणार आहे’, असंही सोमय्यांनी घोषित केलं होतं.Kirit Somaiya left for Kolhapur

किरीट सोमय्या कोल्हापूरच्या दिशेने रवाना 

दरम्यान सायंकाळी सरकारने दोन पावले मागे येत किरीट सोमय्या यांच्या घरासमोरील पोलिस बंदोबस्त हटवण्यात. त्यानंतर सोमय्या हे महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. रवाना होण्यापूर्वी सोमय्या यांनी गणेश विसर्जन केले.त्यानंतर ते कोल्हापूरला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गेले.तिथेही मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पोलिस सोमय्या यांना न जाण्याबाबत समजावत होते परंतु सोमय्यांनी पोलिसांना न जुमानता कोल्हापूरला जाण्याचा निर्णय घेतला.Kirit Somaiya left for Kolhapur