IPL 2021 CSK vs MI Match today : चेन्नई सुपरकिंग्सने जिंकला टाॅस, प्रथम फलंदाजीचा निर्णय

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला विश्रांती

 

दिल्ली : वृत्तसंस्था | इंडियन प्रीमियर लीगच्या अर्थात (Indian Premier League) आयपीएलच्या 14 व्या हंगामातील दुसर्‍या टप्प्याला आजपासून सुरूवात झाली. चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) विरूध्द मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यातील पहिला सामना खेळवला जात आहे.चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) टॉस जिंकला आहे. धोनीने फलंदाजी करण्याचा निर्णय घेता आहे. आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. (IPL 2021 CSK vs MI Match today)

 

आजच्या सामन्याचे ताजे अपडेट पहा बातमीच्या शेवटी 

कोरोना महामारीमुळे थांबवण्यात आलेली IPL स्पर्धेचा दुसरा टप्पा UAE मध्ये होत आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्स  आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने आले आहेत. दुबईच्या (DubaI) आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) टॉस जिंकला. धोनीने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेता आहे. (IPL 2021 CSK vs MI Match today)

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी आजच्या सामन्यात किरोन पोलार्ड (Kieron Pollard) मुंबई मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार आहे. दोन्ही संघ विजयाने पूर्वाधाची सुरुवात करू इच्छित असतील. अशा स्थितीत चेन्नई आणि मुंबईने तंगड्या खेळाडूंची फौज मैदानात उतरवली आहे. दुखापतीने त्रस्त असलेला फाफ डु प्लेसिस खेळण्यासाठी फिट आहे. तो रुतुराज गायकवाड सोबत सलामीला उतरेल (IPL 2021 CSK vs MI Match today)

आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघ खालीलप्रमाणे

चेन्नई सुपर किंग्स XI : एमएस धोनी (कॅप्टन), फाफ डु प्लेसिस, रुतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, जोश हेझलवूड.

मुंबई इंडियन्स XI : किरोन पोलार्ड (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, अनमोलप्रीत सिंह, सौरभ तिवारी, कृणाल पांड्या, ॲडम मिल्ने, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह, आणि ट्रेंट बोल्ट

Breaking :  IPL 2021, MI vs CSK Live : कर्णधार धोनीही बाद, चेन्नईचे चार गडी तंबूत परत, मुंबईच्या गोलंदाजांची धमाकेदार खेळी सुरुच

 

web taital : IPL 2021 CSK vs MI Match today