जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भाजपचे युवा कार्यकर्ते महात्मा फुले ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभागाचे सहसंयोजक डॉ. धर्मराज सुरोसे यांची भाजपा किसान मोर्चाच्या अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती आली आहे.

भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग व भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील काका यादव यांनी धर्मराज सुरोसे यांच्या खांद्यावर किसान मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदार सोपवली आहे. या पदाच्या माध्यमातून शेतकऱ्याचे ज्वलंत प्रश्न , विविध समस्या, सोडविण्याचा व शेतकरी बांधवांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे डॉ. धर्मराज सुरोसे यांनी सांगितले.
डॉ. धर्मराज सुरोसे यांच्या निवडीबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे,आमदार मोनिकाताई राजळे, आमदार राम शिंदे ,अभय आगरकर, राहुल दादा राजळे, तालुकाध्यक्ष तुषारभाऊ वैद्य, अशोकराव गोरे, बापूसाहेब भोसले,बापूसाहेब पाटेकर, आदींनी अभिनंदन केले आहे.