मुंबई : गेल्या सहा दशकांपासून काँग्रेस पक्षात कार्यरत असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत आज जाहीर प्रवेश केला.हा पक्ष प्रवेश सोहळा भाजपा प्रदेश कार्यालयात पार पडला.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशोक चव्हाण यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संखेने यावेळी उपस्थित होते.
