Petrol Diesel Price Hike | पेट्रोल डिझेलचे अच्छे दिन कायम : सलग चौथ्या दिवशी इंधन दरवाढ

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Petrol Diesel Price Hike | देशात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलला अच्छे दिन आले आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत असली तरी अच्छे दिनच्या गारूडामुळे इंधन दरवाढीविरोधात वाॅट्सअप युनिव्हर्सिटीत अथवा रस्त्यांवर कुठलाच आवाज होताना दिसत नाही अशी स्थिती आहे.

पेट्रोल डिझेलची सुरू असलेली ही दरवाढ सामान्यांना रोज वाकुल्या दाखवत आहे.आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेलची दरवाढ झाली आहे.पेट्रोलने आधीच शतक झळकावले आहे.आता त्याची वाटचाल सव्वा शतकाच्या दिशेने तर डिझेलही लवकरच दिमाखात शतक झळकावेल त्या दिवसाच्या जल्लोषासाठी आता सर्वांनीच सज्ज राहायला हवं. (Petrol diesel price hike for fourth day in a row )

पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे दर वाढल्याने भारतात त्याचा मोठा फटका बसला आहे. पेट्रोलिय कंपन्यांनी जाहीर केलेल्या किंमतींनुसार पेट्रोलच्या किंमतीत ३० पैशांनी तर डिझेलच्या दरात ३५ पैशांनी वाढ झाली आहे.

मुंबईमध्ये आज एक लिटर पेट्रोलसाठी १०९.५४ रुपये मोजावे लागतील तर एक लिटर डिझेलसाठी ९९.९२ रुपये मोजावे लागणार आहेत. देशातील इतर प्रमुख राज्यातील पेट्रोल डिझेलच्या किंमती किती आहेत जाणून घ्या.

जामखेड तालुक्यातील आजचे दर

पेट्रोल – ११० रूपये प्रति लीटर

डिझेल – ९८.८४ रूपये प्रति लीटर

दिल्ली

पेट्रोल – १०३.५४ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९१.७७ रुपये प्रति लीटर

कोलकत्ता

पेट्रोल – १०४.२३ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९५.२३ रुपये प्रति लीटर

चेन्नई

पेट्रोल – १०१.०१ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९६ रुपये प्रति लीटर

१८ सप्टेंबरपासून देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. मागील आठवड्यात बुधवारी आणि सोमवारी पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर होत्या. गेल्या ११ दिवसांत पेट्रोलच्या किंमतीत २.३५ रुपयांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किंमती ३.५० रुपयांनी वाढल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किंमती वाढ झाल्याने गुरुवारी ब्रेंट क्रूड ०.४५ डॉलरने वाढले आहेत. त्याचप्रमाणे डब्ल्यूटीआई क्रूड ही ०.५७ डॉलरने वाढून ७८.८७ डॉलर प्रति बॅरलवर पोहचला आहे.

web titel: Petrol diesel price hike for fourth day in a row