Gold Silver Price in Indian Sarafa Market Today | सोन्याच्या दरात घसरण कायम ; 10,000 रूपयांनी सोने स्वस्त! जाणून घ्या आजचा दर

मुंबई : वृत्तसंस्था | Gold Silver Price in Indian Sarafa Market Today | आजपासून सोने चांदीच्या नवीन व्यवहाराच्या आठवड्याची सुरुवात होत आहे. मागील व्यवहाराच्या आठवड्यात सोने आणि चांदी दोन्हींच्या किमतीत घसरण दिसून (Gold PriceToday) आली होती. सोने दरात घसरण झाल्याने ग्राहकांकडून सोने खरेदीचा कल वाढला होता.

चालु आठवड्यात सोने आणि चांदीची सराफा बाजाराची वाटचाल नेमकी कशी असेल याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत.मागील व्यवहाराच्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरणीचा कल जारी राहीला होता.तो नवीन आठवड्यात कायम राहणार का ? याकडे लक्ष लागले आहे.(Gold Silver Price in Indian Sarafa Market Today)

सोने आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 10,000 रुपये स्वस्त झाले आहे, तर चांदी 19000 रुपयांपर्यंत स्वस्त झाली आहे.इंडियन बुल अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) सुटीमुळे शनिवार आणि रविवारी सोने-चांदीचा रेट जारी करत नाही. जाणकारांनुसार, आगामी काळात सोन्याच्या किमतीत आणखी घसरण नोंदली जाऊ शकते. (Gold Silver Price in Indian Sarafa Market Today)

Gold Silver Price in Indian Sarafa Market Today

शुक्रवारी असा होता सोन्याचा दर

गत आठवड्यात व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी  म्हणजेच शुक्रवारी सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी घसरण नोंदली गेली होती. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार शुक्रवारी सोने 1130 रुपयांनी स्वस्त होऊन 45207 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर आले. यापूर्वीच्या व्यवहाराच्या दिवशी गुरुवारी सोने 46337 रुपए प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. (Gold Silver Price in Indian Sarafa Market Today)

शुक्रवारी असा होता चांदीचा दर

तर चांदीच्या किमतीत सुद्धा 708 रुपयांची मोठी घसरण नोंदली गेली. या घसरणीनंतर चांदी 60183 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली. यापूर्वी मागील व्यवहाराच्या दिवशी गुरुवारी चांदी 60891 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. (Gold Silver Price in Indian Sarafa Market Today)

सोने 9890 आणि चांदी 18849 रुपये स्वस्त

मागील ऑगस्टमध्ये सोने विक्रमी 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च स्तरावर पोहचले होते. तेव्हापासून आतापर्यंत किमतीत सुमारे 9890 रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. चांदी आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 18849 रुपये प्रति किलोच्या दराने स्वस्त मिळत आहे. चांदीचा आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर 79980 रुपये प्रति किलो आहे. (Gold Silver Price in Indian Sarafa Market Today)

14 ते 24 कॅरेट सोन्याचा नवीन दर

अशाप्रकारे भारतीय सराफा बाजारात 24 कॅरेट सोने 46310 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेट सोने 46125 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने 42420 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने 34733 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेट सोने 27121 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर ट्रेंड करत होते.

इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोने-चांदीची वाटचाल

अंतरराष्ट्रीय बाजारात सोने वाढीसह 1762 डॉलर प्रति औंसवर पोहचले तर चांदी 22.95 डॉलर प्रति औंसवर राहीली. मागील सत्रात जोरदार घसरणीनंतर हाजीर सोन्याचा दर 1754.86 डॉलर प्रति औंस आहे. मजबूत डॉलरने इतर चलन धारकांसाठी सोन्याच्या आकर्षणास नुकसान पोहचवले.

मुंबई सराफा बाजारात सोन्याचा आजचा दर

मुंबईच्या सराफा बाजारात व्यवहाराच्या पहिल्या दिवसाला सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : gold silver price in indian sarafa market today