देवेंद्र फडणवीस दबंग नेते, ते 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात;भाजपा नेत्याचं खळबळजनक वक्तव्य!

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका’, असं खळबळजनक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केलं आहे. (Devendra Fadnavis domineering leader he carries 100 Ajit Pawar in his pocket)

किरीट सोमय्या प्रकरणावरून चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलंय. महाविकास आघाडी सरकारबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी गृहखात्याबाबत अजून एक खळबळजनक दावा केला आहे. (Devendra Fadnavis domineering leader he carries 100 Ajit Pawar in his pocket)

‘महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना मी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता की, राष्ट्रवादीकडे गृह खातं देऊ नका, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

पाटलांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत शपथ घेतली तेव्हा तुम्ही हा सल्ला फडणवीसांना दिला होता का? असा सवाल पत्रकारांनी केला. पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी ‘देवेंद्र फडणवीस दबंद नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका’, असं वक्तव्य केलं आहे.

त्याचवेळी अजित पवारांसोबत शपथ घेणं ही कॅल्क्युलेटेड रिस्क होती असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. (Devendra Fadnavis domineering leader he carries 100 Ajit Pawar in his pocket)

Devendra Fadnavis domineering leader he carries 100 Ajit Pawar in his pocket

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नव्हे तर आता काँग्रेस नेत्यांचे घोटाळेही भाजप काढणार आहे. तसे सुतोवाचच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. येत्या दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील, असं मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्यावर केलेल्या आरोपमागे चंद्रकांत पाटील यांचा हात असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. त्यानंतर लगेचच चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुश्रीफ यांच्या आरोपांची हवा काढून घेत त्यांनी मुद्द्यावर बोलण्याचं आवाहन केलं. तसेच अनेकांना असं वाटतं की, घोटाळ्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार सापडत आहेत. दोन काँग्रेसच्याही नेत्यांची नावे आली आहेत. दोन दिवसात त्यांचेही विषय समोर येतील, असं विधान करून पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे.

‘हसन मुश्रीफांना ऑफर नव्हती’

हसन मुश्रीफांना कोणतीही ऑफर नव्हती. एखाद्याला ऑफर दिली आणि त्यांनी ती नाकारली तर ती मेरिटवर नाकारतात. त्यामुळे त्यांना त्रास देण्याचं कल्चर आमचं नाही. मुश्रीफांनी हा सगळा ड्रामा बंद करावा. माझे हितचिंतक रस्त्यावर येणार,  कुठलीतरी परिस्थिती दाखवायची. मला त्यांना सांगायचंय, ड्रामा बंद करा, कायद्याची लढाई कायद्याने लढा, असंही पाटील म्हणाले.

 

web title: Devendra Fadnavis domineering leader he carries 100 Ajit Pawar in his pocket