Dangerous Nipah virus infection has increased in Kerala | केरळमध्ये निपाह विषाणूचा धुमाकुळ, देशात चिंतेचे वातावरण

Dangerous Nipah virus infection has increased in Kerala । केरळ : देशात कोरोना पुरता ठाण मांडून बसलाय. कोरोनाची तीव्रता ज्या राज्यांमध्ये सर्वाधिक आहे त्यात केरळचा (Kerala) समावेश आहे. सध्या केरळमध्ये मोठ्या वेगाने कोरोनाचा संसर्ग वाढलेला असतानाच आता केरळपुढे नवीन संकट उभे ठाकले आहे.केरळमध्ये निपाह (Nipah virus) या खतरनाक विषाणूने पुन्हा शिरकाव झाला आहे.

निपाह विषाणूने केरळच्या कोझिकोडमध्ये (Kozhikode) एका १२ वर्षीय मुलाचा बळी घेतला आहे. निपाह विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत असल्याने केरळवासियांच्या चिंता वाढल्या आहेत. याबाबत केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज (Kerala Health Minister Veena George) यांनी रविवारी सांगितले की, निपाह विषाणूच्या संसर्गाने कोझिकोड जिल्ह्यातील एका 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला (National Institute of Virology) पाठवलेल्या नमुन्यात त्याला या विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. (Dangerous Nipah virus infection has increased in Kerala)

या मुलाच्या संपर्क आलेल्या दोन आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही निपाह विषाणू संसर्गाची लक्षणे आढळली आहेत. (Symptoms of Nipah virus infection have also been found in two health workers) त्यापैकी एक खाजगी रुग्णालयात काम करतो तर दुसरा कोझीकोड वैद्यकीय महाविद्यालय कम हॉस्पिटलचा (Kozhikode Medical College Hospital) कर्मचारी आहे. निपाह विषाणूच्या संसर्गाचा उच्च धोका असलेल्या 20 लोकांमध्ये हे दोघे आरोग्य कर्मचारी आहेत असे आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

Dangerous Nipah virus infection has increased in Kerala | केरळमध्ये निपाह विषाणूची लागण होण्याची ही पहिलीच वेळ नाही, तेथे वारंवार अशी प्रकरणे समोर येत आहेत. चला तर मग निपाह विषाणूबद्दल सविस्तर समजुन घेऊयात.. लक्षणे, कारणे, दक्षता, धोका..

निपाह विषाणू संसर्गाची लक्षणे (Symptoms of Nipah virus infection)

1) मेंदुज्वर
2) सतत खोकला आणि श्वासोच्छवासासह ताप
3) तीव्र श्वसन संक्रमण (सौम्य किंवा गंभीर),
4) इन्फ्लूएंझा सारखी लक्षणे – ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, उलट्या होणे, घसा खवखवणे , चक्कर येणे, तंद्री,
5) एन्सेफलायटीस दर्शविणारी न्यूरोलॉजिकल चिन्हे. डब्ल्यूएचओच्या मते, काही प्रकरणांमध्ये लोक न्यूमोनिया देखील विकसित करू शकतात.

निपाह विषाणू किती धोकादायक आहे? (How dangerous is the Nipah virus?)

तज्ञांच्या मते, विषाणूची लागण झालेल्या 40 ते 75 टक्के लोकांचा मृत्यू होतो आणि सर्वात मोठी चिंता म्हणजे यावर कोणताही इलाज नाही. जागतिक आरोग्य संघटनेने निपाह व्हायरसचा समावेश जगातील 10 सर्वात धोकादायक व्हायरसच्या यादीत केला आहे.निपाह विषाणू धोकादायक का आहे याची इतर अनेक कारणे आहेत. त्याचा उष्मायन कालावधी म्हणजे संसर्गजन्य वेळ खूप लांब असतो, कधीकधी 45 दिवस. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीला या विषाणूची लागण झाली तर त्याला त्याबद्दल माहितीही नसते आणि अशा परिस्थितीत तो इतर लोकांमध्ये हा विषाणू पसरवत असतो.

निपाह विषाणू कसा पसरतो? (How is the Nipah virus spread?)

वटवाघूळने (Bats) खाल्लेल्या फळांमध्ये किंवा वटवाघूळांमध्ये नैसर्गिकरित्या निपाह विषाणू आढळतो. एखादी व्यक्ती वटवाघूळांच्या थेट संपर्कात आली तरी त्याला निपाह विषाणूची लागण होऊ शकते. तसेच दूषित अन्न खाऊन देखील मानवांना निपाह व्हायरस संक्रमित करू शकतो. निपाह विषाणूची लागण झालेली वटवाघूळे एखादे फळ खातात, तेव्हा ते आपली लाळ त्यावर सोडतात आणि अशा परिस्थितीत जेव्हा एखादी व्यक्ती त्या फळाचे सेवन करते तेव्हा त्यालाही या विषाणूची लागण होते. लाळे व्यतिरिक्त, हा विषाणू वटवाघूळांच्या लघवीमध्ये आणि शक्यतो वटवाघूळांच्या विष्ठेत आणि जन्मावेळी द्रवपदार्थांमध्ये असतो.

निपाहपासुन बचावासाठी हे करा (What to do to avoid Nipah? )

1) जेवण करण्यापूर्वी आणि नंतर आपले हात धुवा 2) दूषित फळे खाणे टाळा (विशेषतः दूषित खजूर आणि आंबे) 3) संक्रमित व्यक्तीपासून दूर रहा. 4) ज्यांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे त्यांच्या शरीरापासून दूर रहा.5) वटवाघळांपासून दुर रहा 6) वटवाघळांच्या वस्त्या ज्या भागात आहेत तेथील अन्न पदार्थ, फळे खाणे टाळावेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, निपाह विषाणू अनेक प्राण्यांना संक्रमित करतो आणि लोकांमध्ये गंभीर आजार आणि मृत्यूला कारणीभूत ठरतो यामुळे योग्य ती तातडीची खबरदारी घेणे आवश्यक आहे.(Dangerous Nipah virus infection has increased in Kerala)

 

web title: Dangerous Nipah virus infection has increased in Kerala