Breaking news : लोकसभा सचिवालयाकडून काँग्रेस नेते राहूल गांधींविरोधात मोठी कारवाई

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । काँग्रेस नेते राहूल गांधी आणि काँग्रेसला धक्का देणारी मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा सचिवालयाकडून काँग्रेस नेते राहूल गांधींविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाने गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाकडून राहूल गांधी यांची खासदार रद्द करण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Breaking news, Lok Sabha Secretariat has taken  big action against Congress leader Rahul Gandhi

मानहानीच्या खटल्यात सूरतच्या जिल्हा कोर्टानं राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात गांधी यांना जामीनही मंजूर झाला आहे.पण २ वर्षाची शिक्षा झाल्याने त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवलयाने राहुल गांधी यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.

चोरों का सरनेम मोदी क्यो होता है असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यांना हे विधान भोवलं आहे. मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना जामीनही मंजूर केला आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी स्वत: कोर्टात उपस्थित होते.त्यांनी माफी मागण्यास नकार दिला होता.

राहुल गांधी यांच्या विधानामुळे संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान झाल्याचा दावा भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी केला होता. त्यांनी या प्रकरणी कोर्टात केस दाखल केली होती. चार वर्षापूर्वीच्या या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर सुरत जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिला. या प्रकरणात कोर्टाने राहुल गांधी यांना दोषी ठरवलं. त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली. मात्र लगेच राहुल गांधी यांना जामीनही मंजूर करण्यात आला. मात्र त्यांची खासदारकी गेली. लोकसभा सचिवलयाने राहुल गांधी यांच्यावर मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.