Big news Dengue drug found | मोठी बातमी : डेंग्यूवर औषध सापडले, भारतीय शास्त्रज्ञांना मिळाले मोठे यश

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Big news Dengue drug found | भारतात गेल्या काही वर्षांत डेंग्यूने (Dengue Fever) थैमान घातले आहे. दरवर्षी डेंग्यूने मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. डेंग्यूवर उपचार करताना कोणतेही ठोस औषध उपलब्ध नाही. रुग्णांवर लक्षणांच्या आधारावर उपचार केले जात आहेत.डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठोस औषध असणे आवश्यक आहे यासंदर्भात संशोधन करत असलेल्या भारतीय शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे.लखनऊच्या सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी डेंग्यूच्या उपचारात संशोधन करत असताना डेंग्यूवर औषध तयार केलं आहे. लवकरच या औषधाचा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपयोग केला जाणार आहे. (Dengue drug found, Indian scientists get great success)

डेंग्यू हा विषाणूजन्य ताप आहे, ज्यामध्ये पीडित व्यक्तीला असह्य वेदना होतात आणि स्थिती गंभीर झाली तर मृत्यू देखील होऊ शकतो. डेंग्यूला हाडतापदेखील म्हणतात. कारण, डेंग्यूमध्ये रुग्णाच्या हाडांमध्ये तीव्र वेदना होतात. आतापर्यंत डेंग्यूवर कोणताही इलाज नाही. लक्षणांच्या आधारे त्यावर उपचार केले जातात, पण आता शास्त्रज्ञांना त्याचे उपचार सापडले आहेत.

औषधाची क्लिनिकल चाचणी सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच डेंग्यूच्या औषधांची क्लिनिकल ट्रायल सुरू केल्या जाणार आहेत. हे औषध देशातील 20 केंद्रांवर 10 हजार डेंग्यू रुग्णांना दिले जाईल. प्रत्येक केंद्रावर 100 रुग्णांना ट्रायलमध्ये ठेवण्यात येईल आणि त्यांना हे औषध देण्यात येईल. मुंबईतील एका मोठ्या औषध कंपनीने हे औषध तयार केले आहे.

अँटी व्हायरल औषध (Antiviral drug)

शास्त्रज्ञांच्या मते, डेंग्यूचे हे औषध वनस्पतींवर आधारित आहे. त्याला ‘क्युक्युलस हिरसूटसचे शुद्धीकृत जलीय अर्क'(AQCH) असे म्हटले जात आहे. हे अँटी व्हायरल औषध असून औषधाचे उंदीरांवरील प्रयोग यशस्वी झाले आहेत. कंपनीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) कडून मानवी चाचण्यांसाठी परवानगीही मिळाली आहे.

या ठिकाणी चाचणी केली जाईल

देशातील 20 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये डेंग्यूच्या औषधाच्या चाचणीसाठी तयारी केली जात आहे. यामध्ये कानपूर, लखनऊ, आग्रा, मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, अहमदाबाद, कोलकाता, बंगळुरू, मंगलोर, बेळगाव, चेन्नई, चंदीगड, जयपूर, विशाखापट्टणम, कटक, खुर्दा, जयपूर आणि नथवाडा यांचा समावेश आहे. या चाचण्यांमध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रुग्णांना घेतले जाईल. चाचणीसाठी रुग्णाला आठ दिवस रुग्णालयात ठेवले जाईल आणि सात दिवस औषधांचा डोस दिला जाईल. उपचारानंतर 17 दिवसांपर्यंत रुग्णाला निरीक्षणाखाली ठेवले जाईल.