Big breaking news | दिल्लीच्या रोहिणी कोर्टात भरदिवसा गोळीबार, कुख्यात गँगस्टरसह दोघे हल्लेखोर ठार

Two attackers, including a gangster, were shot dead in Delhi's Rohini court

दिल्ली : वृत्तसंस्था । Big breaking news | दिल्लीच्या रोहिणी कोर्टात शुक्रवारी दुपारी गोळीबाराची खळबळजनक घटना घडली. या घटनेत एका गँगस्टरसह दोन हल्लेखोर ठार झाले आहे. या घटनेमुळे देशाची राजधानी दिल्लीत मोठी खळबळ उडाली. (Two attackers, including a gangster, were shot dead in Delhi’s Rohini court)

नवी दिल्ली मधील रोहिणी जिल्हा न्यायालयातील कोर्ट क्रमांक 206 च्या आवारात ही खळबळजनक घटना घडली.

या गोळीबाराच्या घटनेत गँगस्टर अखिल गोगी याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. दोघा हल्लेखोरांनी गँगस्टर गोगीवर बेछूट गोळीबार केल्याने तो जागीच ठार झाला.

गँगस्टरवर अखिल गोगी ऊर्फ जितेंदर मान याच्यावर यापुर्वी 07 लाखांचे बक्षिस जाहिर करण्यात आले होते.

कोर्ट आवारातील पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल हल्लेखोरांच्या दिशेने गोळीबार करत दोघा हल्लेखोरांना यमसदनी धाडले. हल्लेखोर वकिल वेषात कोर्टाच्या आवारात आले होते.

गोळीबाराच्या घटनेत एक महिला वकिल जखमी झाली आहे. भर दिवसा कोर्टाच्या आवारात घडलेल्या या घटनेत तब्बल 40 ते 50 गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान गोळीबाराच्या घटनेत ठार झालेल्या गँगस्टर अखिल गोगी ऊर्फ जितेंदर मान याच्यावर याला आज रोहिणी कोर्टात सुनावणीसाठी आणण्यात आले होते. त्याचवेळी हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला.

 

web tital : Big breaking news Two attackers including a gangster were shot dead in Delhi’s Rohini court