शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाला मिळाली संधी ? वाचा यादी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप्रणित शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा मार्ग आज मोकळा झाला. तब्बल 39 दिवसांनंतर सरकारचा शपथविधी आज राजभवनात पार पडला. शपथविधी सोहळ्यात भाजपकडून 9 तर शिंदे गटाकडून 9 असे 18 मंत्र्यांनी शपथ घेतली.

Who got chance in Shinde-Fadnavis government cabinet? Read the list

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. क्रांतीदिनाच्या मुहूर्तावर मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडत आहे. नव्या सरकारमधील मंत्रिमंडळात दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एकाही महिला आमदाराला मंत्रिमंडळात स्थान दिले गेले नाही.

शिंदे गटाच्या खालील आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश

1) संदीपान भुमरे
2) उदय सामंत
3) दिपक केसरकर
4) तानाजी सावंत
5) अब्दुल सत्तार
6) दादा भूसे
7) गुलाबराव पाटील
8) शंभूराज देसाई
9) संजय राठोड

भाजपच्या खालील आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश

1) गिरीष महाजन
2) चंद्रकात पाटील
3) रविंद्र चव्हाण
4) सुरेश खाडे
5) मंगलप्रभात लोढा
6) विजयकुमार गावीत
7) सुधीर मुनगंटीवार
8) अतुल सावे
9) राधाकृष्ण विखे-पाटील

अहमदनगर जिल्ह्यातून कोणाला संधी ?

राज्याच्या राजकारणात अहमदनगर जिल्ह्याची कायम निर्णायक भूमिका राहिलेली आहे. या जिल्ह्यातून मंत्रिमंडळात कायम दोन किंवा तीन मंत्री असतात. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपाचे निष्ठावंत नेते राम शिंदे यांची वर्णी लागणार असे जवळपास स्पष्ट होते परंतू  त्यांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आले नाही. अहमदनगर जिल्ह्यातून राधाकृष्ण विखे पाटील हे एकमेव मंत्री असणार आहेत. कदाचित मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसर्‍या टप्प्यात राम शिंदे यांना पक्षाकडून संधी दिली जाऊ शकते.