जामखेड टाईम्स वृत्तसेवा : भारतीय हवामान खात्याने अहमदनगर जिल्ह्यात ७ आणि ८ सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान खात्याच्या या इशाऱ्यानुसार जिल्ह्यातील सर्वच भागात आज सकाळपासून पाऊस कोसळत आहे. जामखेड तालुक्यातही सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. ( Indian Meteorological Department has Warning of heavy rains in Ahmednagar district on September 7 and 8)
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाने खालील सुचना जारी केल्या आहेत. (Warning of heavy rains in Ahmednagar district; Instructions issued by District Disaster Management)
1) सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
2) नदी, ओढे, नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावे.
3) पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून दूर जावे.
4) पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल शक्यतो ओलांडू नये.
5) पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये.
6) धोकादायक इमारतीमध्ये आश्रय टाळावा.
7) घाट रस्त्याने प्रवास करणे टाळावे.
8) धरण आणि नदी क्षेत्रामध्ये पर्यटनास जाणे टाळावे.
9) नदीच्या प्रवाहात उतरू नये.
10) मेघगर्जना सुरू असताना झाडांच्या खाली थांबू नये.
11) सर्व प्रकारचे विद्युत खांब, रोहित्रापासून दूर राहण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत.नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी केले आहे.Warning of heavy rains in Ahmednagar district