Vanraj Andekar Pune News : पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकरची हत्या, आधी गोळ्या घातल्या मग कोयत्याने वार, खुनाच्या घटनेने पुणे शहर हादरले !

Vanraj Andekar Pune News : पुण्यातून रविवारी रात्री एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील एका माजी नगरसेवकाला गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे. वनराज आंदेकर (Vanraj Andekar) असे मृत माजी नगरसेवकाचे नाव आहे.पुण्याच्या नाना पेठेत माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने पुण्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. (Vanraj Andhekar News)

Vanraj Andhekar Pune News, Murder of former corporator Vanraj Andhekar in Pune, first shot, then stabbed with coyote, murder incident shook the city of Pune, latest news,

पुण्यामध्ये गोळीबाराचा थरार घडला आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. वनराज आंदेकर यांच्यावर 5 राऊंड फायर करण्यात आले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घरगुती वादातून वनराज आंदेकर यांचा दाजी गणेश कोमकर याने फायरिंग केल्याचे समजते. गणेश कोमकर याने काही वर्षांपूर्वी शिवसेना शहर प्रमुख रामभाऊ पारेख याच्यांवर अॅसिड हल्ला केला.अशी प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते आहे  (vanraj andekar latest news)

रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नाना पेठेतल्या डोके तालीम परिसरात वनराज आंदेकर थांबले होते तेव्हा त्यांच्यावर हल्लेखोराने बंदुकीतून पाच राऊंड फायर केले. गोळीबारानंतर आंदेकर यांच्यावर कोयत्यानेही वार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हल्लेखोर दुचाकीवरून आले होते. या हल्ल्यानंतर वनराज आंदेकर यांना गंभीर जखमी अवस्थेत केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र केईएम रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान गोळीबाराच्या आधी डोके तालीम भागामध्ये वीज पुरवठा खंडीत झाल्याची माहिती मिळत आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर हा गोळीबार झाल्यामुळे नाना पेठ परिसरामध्ये दहशतीचं वातावरण आहे.

वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करणारे हल्लेखोर फरार झाले आहेत. घटनास्थळी समर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलीसही दाखल झाले आहेत. वनराज यांच्यावर वैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. गोळीबारामागचे कारण समजू शकले नाही.

उदयकांत आंदेकरनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिलं होतं, पण ते दुकान पुणे मनपाने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडलं, त्याच रागातून सख्ख्या दाजीने वनराज आंदेकरची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. आंदेकर कुटुंबातील मुलगी लग्न करून कोमकर कुटुंबात दिली होती, वरून त्यांना घर आणि दुकानही चालवायला दिलं होतं, पण घरगुती वादातून आंदेकरची हत्या केल्याचं बोललं जात आहे.

वनराजचे वडील बंडू आंदेकर याच्यासह आंदेकर कुटुंबाचा टोळीशी संबंधित कारवायांचा कुप्रसिद्ध इतिहास आहे. नुकतेच बंडू आंदेकरसह इतर सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याआंतर्गत (मकोका) आरोप ठेवण्यात आले होतं, पण याप्रकरणी जामीन मिळाला होता. वनराज आंदेकरवर हल्ला करणाऱ्यांमध्ये गणेश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड, तुषार आबा कदम अशी संशयितांची नावं आहे. पोलीस सध्या मारेकऱ्यांच्या शोधात आहेत.

आंदेकर कुटूंबाला राजकीय वारसा

२०१७ सालच्या महापालिका निवडणुकीमध्ये वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. विशेष म्हणजे वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर या देखील २००७ आणि २०१२ या दोन वेळा नगरसेविका होत्या. वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकात आंदेकर हेही नगरसेवक होते. २०२० त्यांचं देखील अल्पश्या अजाराने निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबातील वत्सला आंदेकर यांनी पुणे शहराचा महापौरपद भुषविले आहे. १९९८-९९मध्ये पुणे महापालिकेच्या महापौर म्हणून त्या निवडून आल्या होत्या.

आंदेकर कुटूंबाला गुन्हेगारी पार्श्‍वभूमी

आंदेकर टोळी गेली पंचवीस वर्ष पुण्यात गुन्हेगारी कारवाया करत असून प्रमोद माळवदकर या गुंडाच्या खुनाच्या प्रकरणी बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर याला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न खंडणी मारामारी यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत आंदेकरविरुद्ध १९८५ पासून खून, खुनाचे प्रयत्‍न, धमक्या देणे, शस्त्रे बाळगणे, अपहरण अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे पुण्यातील फरासखाना, खडक व समर्थ या पोलीस ठाण्यात, तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

आंदेकर-माळवदकर टोळीयुद्धातून झालेल्या खूनप्रकरणात सूर्यकांत आंदेकरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. जन्मठेपेची शिक्षा भोगून आल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारी कारवायांना सुरुवात केली. त्याच्या दहशतीमुळे स्थानिक नागरिक तक्रार करण्यासही पुढे येत नव्हते. सू्र्यकांत आंदेकरचा भाऊ उदयकांत हा पुणे महापालिकेत 2012 पासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नगरसेवक होता.