खर्ड्यातील दोन देवस्थानांना तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत ‘ब’ वर्ग दर्जा

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा शहरातील श्री क्षेत्र सिताराम गड व संत गिते बाबा समाधी मंदिर या दोन्ही धार्मिक स्थळांचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश झाला आहे. दोन्ही ठिकाणांना ‘ब’ वर्ग दर्जात आला आहे. आमदार रोहित पवार यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून दिनांक 6 जानेवारी 2022 रोजी खर्डा शहरातील सिताराम गड व संत गिते बाबा समाधी या दोन्ही धार्मिक स्थळांना ‘ब’ वर्ग दर्जासाठीची मान्यता मिळाली आहे. यामुळे दोन्ही ठिकाणी विविध विकास कामांना आता दणक्यात प्रारंभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

खर्डा येथील सिताराम गड व संत गीते बाबा समाधी मंदिर याठिकाणी राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. या ठिकाणी भाविकांना सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या स्थळांचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश व्हावा याकरिता सातत्याने मागणी होत होती.

ती मागणी नगरविकास विभागाने मान्य केली. आमदार रोहित पवार यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. खर्डा शहरातील सिताराम गड व संत गिते बाबा समाधी या दोन्ही धार्मिक स्थळांना ‘ब’ वर्ग दर्जासाठीची मान्यता मिळाली आहे.