Rohit Dada Pawar | रोहित दादांनी उमेदवारी केली अन एका झटक्यात संपूर्ण देशात कर्जत – जामखेडचे नाव झाले

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | कर्जत – जामखेड चे आमदार रोहित पवार (Rohit Dada Pawar) यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात राज्यात साजरा होत आहे. रोहित दादांनी विधानसभा निवडणुकीत राज्यातील युवा वर्गावर गारूड निर्माण केले होते. गेल्या दहा वर्षांपासून पुण्यात वकिली व्यवसाय करत असलेले ॲड विकास शिंदे (चापडगाव ता.कर्जत ) यांनी रोहित दादांच्या कार्याचा आढावा घेतला आहे.

मानवी हक्कांसाठी पुण्यासह महाराष्ट्रात जवळपास ८-९ वर्षांपासून काम करत असल्यामुळे निवडणूकीत कोणत्याही पक्षाचा प्रचार करण्याचा कधी संबंध  आला नव्हता. मात्र रोहित दादा पवार आमच्या मतदारसंघात उभे राहिले.आणि दादा निवडून आले पाहिजेत त्यासाठी आपणही प्रचारात सहभागी झाले पाहिजे असे मनातून वाटायला लागले. गावाकडे आलो दादांची भेट घेतली आणि उतरलो प्रचारात. घरोघरी जाऊन आम्ही प्रचार करत होतो. घरातील लहान मुलं तर दादा सोडून कोणाचे नाव घ्यायलाच तयार नसायची.

अनेक वर्षांपासून कामाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरत असताना, लोक विचारायचे ‘तुमचं गाव कुठलं ? आम्ही सांगायचो कर्जत. ‘कर्जत म्हणजे ते मुंबई कडील का?’ असा प्रश्न लोकांनी विचारला की अरे आपल्या गावाला काही ओळख आहे की नाही? असं वाटायचं. आणि हे खुप वेळा, खुप लोकांसोबत घडले आहे. आपल्या भागाची चांगली ओळख असणं ही अभिमानाची बाब असते. आमदार रोहित दादांनी कर्जत-जामखेड मतदार संघ निवडला आणि एकाच झटक्यात संपूर्ण देशाला कर्जत-जामखेड हे नाव माहीत झाले.

महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणातील अग्रगण्य व्यक्तिमत्व आदरनीय शरद पवार साहेबांचे राजकीय वारसदार म्हणून मागील अडीच-तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राला परिचित झालेले नाव म्हणजे रोहित राजेंद्र पवार. पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम सुरू असतानाच रोहित दादा पवार हे नाव  आमदार म्हणून महाराष्ट्राला परिचित झालं आहे. वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमांतून आमदार रोहित पवार हे सतत राज्यात चर्चेत आहेत. आपल्या अनोख्या कार्यशैलीमुळे ते अल्पावधीतच राज्यातील तरूणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.

कोरोना काळात मतदारसंघात रूग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी रोहीत दादांनी उभारलेल्या मोफत कोविड सेंटरमुळे अनेकांचे प्राण वाचले. मागील दोन वर्षांपासून मतदारसंघात विकासाचे वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. रस्ते, पाणी, शेती, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात भरीव काम केले जात आहे. शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहचवल्या जात आहेत. कुकडीचे नियमित आवर्तने सुरू झाली आहेत. नदी ओढा खोलीकरणाच्या मोहिमेतून जलक्रांती येणार आहे. मतदारसंघात विकासाची गंगा आणण्यासाठी रोहित दादांचा जोरदार पाठपुरावा सुरू आहे.

रोहित दादांच्या माध्यमांतून कर्जत – जामखेडमध्ये विकासाचा नवा झंझावात सुरू झाला आहे. अनेक उपक्रम मतदारसंघात सुरू आहेत. रोहित दादांच्या रूपाने सुरू असलेला विकासाचा हा झंझावात जनतेत लोकप्रिय ठरत आहे.रोहित दादांच्या माध्यमांतून खर्डा किल्यावर बसवल्या जाणाऱ्या भव्य दिव्य अश्या भगव्या स्वराज्य ध्वज यात्रेमुळे मतदारसंघाची सध्या देशात चर्चा होत आहे. कर्जत – जामखेडला देशात नवी ओळख मिळाली आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान होण्याची ताकद रोहित दादांमध्ये दिसून येते. त्यासाठी आवश्यक प्रचंड मेहनत, उर्जा आणि सातत्य टिकून राहण्यासाठी दादांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

ॲड. विकास शिंदे (9604536060)
(लेखक पुणे जिल्हा न्यायालयात वकिली करतात व सामाजिक-कायदेविषयक चळवळीत सक्रिय आहेत.)