शर्वरी खराडेचे गोवा स्पर्धेत घवघवीत यश | Sharwari Kharade’s success in Goa competition

जामखेड टाईम्स वृत्तसेवा,दि,2 जानेवारी,2021 | कर्जत येथील शर्वरी राजेंद्र खराडे हिने गोवा येथे पार पडलेल्या २२ व्या राष्ट्रीय शिकई मार्शल आर्ट (तलवारबाजी) स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत कास्य पदक प्राप्त केले आहे. (Sharwari Kharade’s success in Goa competition)

शर्वरी राजेंद्र खराडे हि कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिने गोवा येथे पार पडलेल्या २२ व्या राष्ट्रीय शिकई मार्शल आर्ट (तलवारबाजी) स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत तिने उल्लेखनीय कामगिरी केली. शर्वरी या स्पर्धेत कास्य पदक कमावले.

Sharwari Kharade's Success In Goa Competition

तिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाळ कांबळे, क्रीडा शिक्षक प्रा संतोष भुजबळ, कराटे प्रशिक्षक संदीप पांढरकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शर्वरीचे कर्जत शहर आणि तालुका परिसरात विशेष कौतुक होत आहे.