जामखेड : शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशनसाठी प्रविण शिंदे यांची निवड !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणाऱ्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’साठी जामखेड तालुक्यात कार्यरत असलेले शिक्षक प्रविण शिंदे यांची यंदा निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे जामखेडच्या शैक्षणिक वर्तुळात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Selection of Pravin Shinde for Sharad Pawar Inspire Fellowship in Education, jamkhed latest news,

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप अंतर्गत कृषी, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रातील गुणवंतांना भविष्यकाळातील नेतृत्वासाठी प्रेरीत केले जाते.या फेलोशिपसाठी ऑनलाईन अर्ज व प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्याला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला होता.निवड समितीने शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशनसाठी राज्यभरातून ४० फेलोंची निवड केली.

जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील मळईवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेेत कार्यरत असणारे उपक्रमशील शिक्षक प्रवीण भिमराव शिंदे यांची शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशनसाठी प्रविण शिंदे यांची निवड झाली आहे. यासाठी गटविकास अधिकारी  प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, केंद्रप्रमुख सुरेश कुंभार यांचे अनमोल मार्गदर्शन लाभल्याचे प्रविण शिंदे यांनी सांगितले

प्रविण शिंदे हे अरणगाव येथील मळईवस्ती प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

प्रविण शिंदे यांनी डिजिटल लिटरसी अभ्यासक्रम प्रारूप विकसन व परिणामकारकतेचा अभ्यास करणे या विषयी प्रस्ताव परिषदेला सादर केला होता. प्रवीण शिंदे हे उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांची शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन फेलोशिप साठी निवड झाल्याबद्दल जामखेड तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे.

‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’ चा संपुर्ण निकाल पाहण्यासाठी क्लिक करा