स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पाटोद्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख कानी देशभक्तीपर गीतांची धून.. डोक्यावर मानाचे फेटे, हाती ट्रॉफी..आणि गुरूजनांसह गावकऱ्यांच्या टाळ्यांचा कडकडाट.. पाल्याच्या कौतुक सोहळ्याने भारावून गेलेले पालक..असे विलोभनीय दृश्य जामखेड तालुक्यातील पाटोदा (गरडाचे) येथे नुकतेच पाहायला मिळाले. निमित्त होते माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचे.

Meritorious students felicitated in Patoda on occasion of Amrit Mahotsav of Independence

जामखेड तालुक्यातील पाटोदा (गरडाचे) माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांच्या पुढाकारातून दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या साक्षी गौतम माने, ज्ञानेश्वरी संदीप सासवडकर, साक्षी भाऊसाहेब काळे, मुक्ता विष्णू भाकरे, आश्विनी बाळु खटके, या विद्यार्थ्यांनीचा गौरव करण्यात आला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची दखल घेत, त्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी करिअर विषयक मार्गदर्शन व्हावे, यासाठी व त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी यासाठी पाटोदा (गरडाचे) येथील माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कल्याण कवादे, मुकुंद कडु, बाबासाहेब माने, अशोक खाडे, नाना कवादे, समीर पठाण, बिबीशन कवादे, खंडुराजे कवादे, मच्छिंद्र लंगे, भाऊसाहेब कवादे, देवा मोरे, पांडु शिंदे, पिंटु कडु पाटील, प्रमेश्वोर मोरे, जोगेंद्र थोरात, शाळेचे शिक्षक बी.एल तोरडमल, मुख्याध्यापक, व्ही.एस पोंदे, बी.के खंडागळे, व्ही.व्ही अनारसे, सी.बी बनकर, यु. एस पाटील, एस.एस वस्तारे, एम.एस मार्कंडे, ए. के शिंदे, शिपाई सी. झेड भैलुमे, आर. पी जमदाडे सह आदी उपस्थित होते.

गुणवंतांचा गौरव – 10 वर्षांपासूनची परंपरा

आजही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता अफाट आहे, फक्त त्यास योग्य दिशा देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पाठबळ देण्यासाठी दरवर्षी गुणवंतांचा पठाण यांच्याकडून गुणगौरव केला जातो. सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या गफ्फारभाई पठाण यांच्या वतीने गेल्या 10 वर्षांपासून ‘गुणवंतांचा सत्कार व मार्गदर्शन’ हा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. या उपक्रमाचे तालुक्यातून कौतुक होत आहे.

यांचा करण्यात आला गौरव

साक्षी गौतम माने
ज्ञानेश्वरी संदीप सासवडकर
साक्षी भाऊसाहेब काळे
मुक्ता विष्णू भाकरे
आश्विनी बाळु खटके