Pune gang rape case : सामुहिक बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला; पुण्यातील आठ बलात्कार्‍यांना अटक !

आरोपींमध्ये दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेश

Pune gang rape case | pune crime news today | पुणे: अल्पवयीन मुलीवर सामुदायिक बलात्काराची घटना पुण्यात घडली आहे. या घटनेत नऊ नराधम मुलीवर सलग दोन दिवस सामुदायिक बलात्कार करत होते. या घटनेची वाच्यता होताच महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीला कलंकित करणाऱ्या या घटनेतील आठ नराधमांना बेड्या ठोकण्यात पुणे पोलिसांना मोठे यश आले आहे. (Eight rapists arrested in Pune)

मित्राला भेटण्यासाठी मुंबईला निघालेल्या एका 14 वर्षीय मुलीवर प्रवासासाठी पैसे देण्याचे आमिषाने आठ ते नऊ जणांनी सलग दोन दिवस सामूहीक बलात्कार (Pune gang rape case) केल्याची धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. शहरातील शिवाजीनगर, पुणे स्टेशन व खडकी परिसरातील लॉज व अज्ञात ठिकाणी नेऊन संबंधीत मुलीवर नराधमांनी बलात्कार केल्याचे तपासात समोर आले आहे.

याप्रकरणी वानवडी पोलिसांनी मशाक अब्दुलमजिद कान्याल (वय.27,रा. वैदुवाडी हडपसर),अकबर उमर शेख (वय.32, रा. मंगळवार पेठ जुना बाजार), रफिक मुर्तजा शेख (वय.32, रा. मंगळवार पेठ), अजरुद्दीन इस्लामुद्दीन अन्सारी (वय.27,रा. कासेवाडी), प्रशांत सॅम्युयल गायकवाड (वय.32,रा. ताडीवाला रोड), राजकुमार रामनगीना प्रसाद (वय.29,रा. घोरपडी गाव), मोईब नईम खान (वय.24,रा. बोपोडी), असिफ फिरोज पठाण (वय.36,रा. लोहीयानगर) या आठ जणांना बेड्या ठोकल्या आहे. या नराधमांना  न्यायालयाने 16 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. (Pune gang rape case)

आरोपींमध्ये रेल्वेचे दोन कर्मचारी, रिक्षा चालक व इतर आरोपींचा सहभाग आहे. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे तब्बल दोन दिवस मुलीवर नराधमांनी अत्याचार केले आहेत. पहिल्या दिवशी चौघांनी तर दुसर्‍या दिवसी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला. पिडीत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानतंर पोलिसांच्या तपासादरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुलीला वानवडी पोलिसांनी चंदीगड येथून ताब्यात घेतल्यानंतर तिने ही आपबिती सांगितली.