जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Revenue Department | महसूल विभाग आणि महाराष्ट्र शासन मार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त व महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत स्वाक्षरीसह संगणकीकृत डिजिटल मोफत सात बारा वाटप कर्जत तालुक्यातील प्रत्येक सजेत वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम कर्जत तालुक्यात राबविण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली.
महाराष्ट्र शासन यांच्या अनुषंगाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिम्मित महसुल विभागाच्यावतीने महात्मा गांधी जयंतीनिम्मित दि २ ऑक्टोबरपासून लाभार्थी शेतकरी आणि खातेदाराना स्वाक्षरीसह संगणकीकृत डिजिटल मोफत सातबारा वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील प्रत्येक सजेच्या किमान एका गावात जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत सातबारा वाटप करण्यात आले. थेरवडी ता. कर्जत येथे तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते गावातील माजी सैनिक अथवा कार्यरत सैनिक यांचे कुटुंबीय, १९४७ साली जन्म असणारे खातेदार, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेले शेतकरी, २ ऑक्टोबर जन्मतारीख असलेले खातेदार, गावातील वरिष्ठ महिला खातेदार यांना शनिवारी मोफत ७/१२ वितरित करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी तलाठी अविनाश रोडगे, सरपंच छाया गोडसे, माजी सरपंच वसंत कांबळे, हनुमंत थोरात, मनोहर गदादे, नाना गोडसे आदी उपस्थित होते. यासह नागापूर(ता.कर्जत) याठिकाणी निवासी नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे, अव्वल कारकून अशोक नरोड, तलाठी
निलेश साळुंके तर निंबोडी येथे नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले, तलाठी धुळाजी केसकर यांच्या हस्ते संबंधित गावाचे ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील स्थानिक पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
सदर मोहिमेअंतर्गत तालुक्यातील सर्व गावात १००% शेतकरी खातेदारांना मोफत सातबाराचे वाटप घरपोच तलाठी यांच्यामार्फत करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली.
web titel : Revenue Department | Launch of Free Computerized Digital Satbara Distribution Campaign in Karjat Revenue Department