जामखेड टाईम्स वृत्तसेवा | सत्तार शेख | Karjat Nagar Panchayat Results | संपुर्ण राज्यात गाजलेल्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला चारीमुंड्या चित केले. आघाडीने तब्बल 15 जागांवर विजय संपादन केला.
कर्जत नगर पंचायत निवडणुकीत भाजप विरूध्द राष्ट्रवादी हा सामना रंगला होता. या निवडणुकीत आमदार रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच दोन्ही नेते आमने सामने आले होते. या निवडणुकीत अखेर रोहित पवारांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला 12 जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेसला 3 तर भाजपला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले.
कर्जत नगरपंचायतच्या 17 जागांसाठी आज मतमोजणी पार पडली. सकाळी 10 वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. काही वेळातच सर्व निकाल हाती आले.
विजयी उमेदवारांची यादी
1) छाया सुनिल शेलार
2) ताराबाई सुरेश कुलथे
3) प्रतिभा नंदकिशोर भैलूमे
4) भास्कर बाबासाहेब भैलूमे
5) उषा अक्षय राऊत
6) मोहिनी दत्तात्रय पिसाळ
7) नामदेव देवा राऊत
8) सुवर्णा रविंद्र सुपेकर
9) ज्योती लालासाहेब शेळके
10) संतोष सोपान मेहेत्रे
11) अश्विनी गायकवाड
12) रोहिणी सचिन घुले
13) मोनाली ओंकार तोटे
14) सतिश उध्दवराव तोरडमल
15) भाऊसाहेब सुधाकर तोरडमल
16) अमृत श्रीधर काळदाते
17) खरात
राष्ट्रवादी १२, कॉंग्रेस 3 , भाजप २
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली 15 जागा पटकावत राष्ट्रवादी व काँग्रेसने कर्जत नगरपंचायतीवर एकहाती वर्चस्व मिळवले. तर माजीमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपला अवघ्या 2 जागा मिळाल्या. या निवडणुकीत राम शिंदे यांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला.विकासाच्या राजकारणाला कर्जतच्या जनतेने साथ दिली अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांनी दिली.
कर्जत नगरपंचायतीच्या 17 जागेची मतमोजणी बुधवारी सकाळी 10 वाजता कर्जत तहसील कार्यालयाच्या आवारात संपन्न झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने प्रथम क्रमांकाची पसंती देत 12 जागांवर कौल दिला. तर आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने आपल्या तिन्ही जागेवर दिमाखदार विजय संपादन करीत राष्ट्रवादीला साथ दिली.
आ रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी आणि काँग्रेसला 15 जागा मिळाल्या. आघाडीने भाजपाला धोबीपछाड देत सत्ता काबीज केली . तर भाजपाला अवघ्या दोनच जागेवर समाधान मानत आपली अब्रू वाचविता आली. माजीमंत्री राम शिंदे यांना पुन्हा एकदा आ रोहित पवार यांनी जोर का झटका दिला.
- मोठी बातमी : विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या बारामती दौऱ्यात सुरक्षा आणि राजशिष्टाचारात कसूर करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा !
- मुंबई : श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने करा – सभापती प्रा.राम शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश
- जागतिक आरोग्य दिनानिमित्त हाळगावच्या शासकीय कृषि महाविद्यालयात वैद्यकीय तपासणी शिबीर संपन्न
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या विविध प्रश्नांसंदर्भात मुंबईत पार पडली उच्चस्तरीय बैठक, सभापती राम शिंदे यांनी प्रशासनाला दिले महत्वपूर्ण निर्देश
- Ram Shinde : डिजिटल शिक्षण ही विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता आणि कल्पनाशक्तीला चालना देणारी जादुई खिडकी – सभापती प्रा राम शिंदे
माजीमंत्री राम शिंदे यांनी प्रचारात आ पवार यांच्यावर दहशतीचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला होता मात्र आजच्या निकालाने कर्जतकरांनी तो आरोप सपशेल फोल ठरवथ झुगारून लावला. आ पवार यांनी केवळ विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करीत जनतेला साद घातली होती. जनतेने त्यास मान्यता देत आ रोहित पवार यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला.
राष्ट्रवादीचा शुन्य ते बारा प्रवास थक्क करणारा
कर्जत नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे खाते शून्य होते. तर आजच्या निवडणुकीत १२ उमेदवारांनी विजय संपादन करीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला. आ रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने मोठे यश मिळवत भाजपाच्या ताब्यातील नगरपंचायत आपल्याकडे खेचली.
प्रभाग क्रमांक दोनचा निकाल प्रशासनाकडून प्रलंबितच
प्रभाग क्रमांक दोन जोगेश्वरवाडीच्या भाजपाचे उमेदवार नीता कचरे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर त्यास भाजपाने न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे आजच्या निकालात जोगेश्वरवाडीचा निकाल प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला नाही. मात्र कचरे यांच्या माघारीनंतर राष्ट्रवादीचे लंकाबाई खरात यांचा एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने त्याचा विजय निश्चित मानला जात आहे.