अखेर आमदार राम शिंदेंमुळे विटभट्टी धारकांना मिळाला न्याय, विटभट्टी धारकांनी साजरा केला आनंदोत्सव !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध प्रश्नांसाठी जोरदार पाठपुरावा करणाऱ्या आमदार प्रा राम शिंदे यांनी पुन्हा एकदा आपला राजकीय करिष्मा दाखवत मोठा प्रश्न मार्गी लावला आहे. आमदार राम शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अहमदनगर जिल्ह्यासह कर्जत-जामखेड मतदारसंघातील विटभट्टी धारकांचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.

Finally due to the follow up of MLA Ram Shindethe brick kiln owners got justice

शासनाच्या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जामखेड तालुक्यातील विटभट्टी धारकांचा व्यवसाय बंद पडला होता. यामुळे जामखेड तालुक्यातील 200 विटभट्टी धारक त्रस्त झाले होते. जामखेड तालुक्यातील विटभट्टी धारकांनी या प्रश्नांबाबत आमदार रोहित पवार यांना भेटून निवेदन दिले होते, परंतू या प्रश्नांवर मार्ग काढण्यात आमदार रोहित पवारांना यश आले नव्हते. यामुळे विटभट्टी धारकांमध्ये नाराजी पसरली होती.

Finally due to the follow up of MLA Ram Shindethe brick kiln owners got justice
आमदार राम शिंदे यांना 24 नोव्हेंबर 2022 रोजीभेटलेले जामखेड तालुक्यातील विट भट्टी धारक

दरम्यान, जामखेड तालुक्यातील 200 विटभट्टी धारकांनी 24 नोव्हेंबर 2022 रोजी आमदार प्रा राम शिंदे यांची चोंडी येथील निवासस्थानी भेट घेऊन आपली कैफियत मांडली होती. यावेळी आमदार राम शिंदे यांनी विटभट्टी धारकांचा प्रश्न समजून घेत या प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, महसूल विभागाचे जॉईंट सेक्रेटरी राजेंद्र चव्हाण व आरडीसी अहमदनगर यांच्याबरोबर कॉन्फरन्सिंग कॉलद्वारे चर्चा केली होती. यात शासनाच्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावला असल्याचे निदर्शनास आले होते.

शासनाच्या परिपत्रकाचा अर्थ काय याबाबत महसुल विभागाचे जॉईन सेक्रेटरी यांच्याकडून निर्देश आल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यासह जामखेड तालुक्यातील विटभट्टी धारकांच्या माती वाहतुकीचा प्रश्न मिटणार होता. अखेर आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. महसूल विभागाकडून नवे निर्देश जारी करण्यात आले आहेत. विट भट्टी धारकांचे माती वाहतुकीचे बंधन उठवण्यात आले आहे. या निर्णयामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघासह अहमदनगर जिल्ह्यातील हजारो विट भट्टी धारकांना मोठा न्याय मिळाला आहे. जे काम आमदार रोहित पवारांना जमू शकले नाही ते काम आमदार प्रा राम शिंदे यांनी करून दाखवल्याने विट भट्टी धारकांनी मोठा जल्लोष केला आहे.

शासनाच्या आदेशात नेमकं काय म्हटलयं ?

दरम्यान, महसुल व वन विभागाचे कक्ष अधिकारी यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपल्या संदर्भाधीन पत्रान्वये गौण खनिजाचे तात्पुरते परवाने निर्गमित करण्याच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने मार्गदर्शन होणेबाबतचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे. त्यानुषंगाने आपणास कळविण्यात येते की, संदर्भाधीन क्रमांक २ दिनांक १४.०९.२०२२ च्या पत्रान्वये केंद्र शासनाच्या पर्यावरण वन व वातावरणीय बदल मंत्रालयाच्या दिनांक २८.०३.२०२० रोजीच्या अधिसूचनेतील परिशिष्ट ९ मध्ये क्रमांक ६ वर नमुद केलेल्या बाबीसाठी गौण खनिज उत्खननास परवानगी देताना पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय, भारत सरकार यांनी दिनांक ०८.०८. २०२२ च्या कार्यालयीन ज्ञापनाद्वारे दिलेल्या स्पष्टीकरणानुसार संबंधित सर्व शासकीय विभागांनी कार्यवाही करणेबाबत देण्यात आलेल्या सूचना स्पष्ट आहेत.

त्यामध्ये विटभट्टीसाठी माती उत्खननाकरीता तात्पुरता परवाना देणे ही बाब समाविष्ट नाही. त्यामुळे विटभट्टी माती उत्खननाकरीता आणि दिनांक २८.०३.२०२० रोजीच्या अधिसूचनेतील परिशिष्ट ९ मध्ये क्रमांक ६ वरील बाब वगळता उर्वरीत सर्व कामाकरीता महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, २०१३ च्या नियम ६६ (१) मधील शर्तीनुसार तात्पुरता परवाना निर्गमित करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश जारी करण्यात आले आहेत.