जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । सर्वधर्मीयांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व अशी ओळख असलेल्या आमदार रोहित पवार यांच्यामुळे जामखेडमधील एका मस्जिदचा महत्वाचा प्रश्न निकाली निघाला आहे. यामुळे मुस्लिम बांधवांकडून आमदार रोहित पवार यांचे आभार मानले जात आहेत.
जामखेड शहरातील कुरेशी मोहल्ला परिसरात मुस्लिम बांधवांकडून मस्जिद -ए – मोहम्मद या मस्जिदचे बांंधकाम हाती घेण्यात आले आहे. या मस्जिदच्या सॅल्बचे काम करताना महावितरणच्या विद्यूत खांंबांंसह तारांचा मोठा अडथळा येत होता.विद्यूत खांब बांधकामास अडथळा ठरत असल्याने मस्जिदचे बांधकाम रखडले होते.
मस्जिदच्या बांधकामास विद्यूत खांबांचा अडथळा येत असून संबंधित खांब स्थलांतरीत करण्यात यावेत अशी मागणी काही दिवसांपुर्वी आमदार रोहित पवार यांच्याकडे मुस्लिम बांधवांकडून करण्यात आली होती. या मागणीची तातडीने दखल घेत आमदार रोहित पवार यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून पोल स्थलांतर करण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या होत्या. त्यानुसार मस्जिद -ए – मोहम्मद जवळील महावितरणचे पोल स्थलांतरीत करण्याचे काम नुकतेच पुर्ण करण्यात आले.
आमदार रोहित पवार यांच्या माध्यमांतून मस्जिद -ए – मोहम्मद जवळील विद्यूत पोल स्थलांतरीत करण्यात आल्यामुळे मस्जिदचे अपुर्ण काम पुर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रोहित पवारांनी केलेल्या भरीव सहकार्यामुळे मस्जिदचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागला. याबद्दल जामखेड शहरातील मुस्लिम बांधवांकडून आमदार रोहित पवार यांचे आभार मानले जात आहेत.