शेर ए म्हैसूर हजरत टीपू सुलतान यांची जयंती साजरी

कर्जत  : कर्जत शहर ईदगाह मैदानात शेर ए म्हैसूर हजरत टीपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यात आली. टीपू सुलतान यांच्या प्रतिमेस आ रोहित पवार यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी टीपू सुलतान यांचा ऐतिहासिक जीवनपट मौलाना आखलाक अहमद यांनी उपस्थितांसमोर मांडला.

२० नोव्हेंबर शेर ए म्हैसूर हजरत टीपू सुलतान यांचा जन्मदिवस. कर्जत शहरातील ईदगाह मैदानात कर्जत जामखेडचे आ रोहित पवार यांच्या हस्ते टीपू सुलतान यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, टीपू सुलतान यंग ग्रुपचे अध्यक्ष शरीफ पठाण, रज्जाक झारेकरी, अमृत काळदाते, सुनील शेलार, सचिन सोनमाळी, सचिन कुलथे, शब्बीरभाई पठाण, माजीद पठाण, प्रा विशाल मेहत्रे, भास्कर भैलुमे, लतीफभाई पठाण, इल्लूभाई पठाण, शकील पठाण, अमीन झारेकरी, सुफियान सय्यद, मुश्ताक सय्यद, डॉ प्रकाश भंडारी, नितीन धांडे, युनूस कुरेशी, राजू बागवान आदी उपस्थित होते.