अनुराधा राऊतचा देशपातळीवर डंका; राष्ट्रीय योगासन स्पर्धेत पटकावला सहावा क्रमांक !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील चापडगावच्या अनुराधा पंकज राऊत हिने देशपातळीवर मोठी कामगिरी केली आहे, १४ ते १६ वर्षे वयोगटासाठी देशपातळीवर घेण्यात आलेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत सहावा क्रमांक पटकावण्याची किमया किली आहे. अनुराधाने कर्जतची शान देशपातळीवर उंचावल्याने तिचे कौतुक होत आहे. (Anuradha Raut’s national fame, Sixth place in National Yogasana Competition)

कर्जत तालुक्यातील चापडगावचे विद्यार्थी कायमच वेगवेगळ्या स्पर्धेत बाजी मारताना दिसतात. स्पर्धा परीक्षा असो कि क्रीडा प्रकार यात चापडगावचे विद्यार्थी कायम यश मिळवत आले आहेत. त्यातच योगा या व्यायाम प्रकारामध्येही चापडगाव मागे नसल्याचे सिद्ध झाले आहे.

चापडगाव येथील अनुराधा पंकज राऊत हि विद्यार्थिनी योग या व्यायाम प्रकारात सध्या देश आणि राज्य पातळीवरील स्पर्धा गाजवत आहे. लवकरच ती आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाकडून खेळताना दिसावी अशीच कर्जतकरांची अपेक्षा आहे.

Anuradha Raut's national fame Sixth place in National Yogasana Competition!

दरम्यान अनुराधा राऊत हिने मिळवलेल्या यशाबद्दल बोलताना वृक्षवल्ली ग्रुपचे ॲड. विकास शिंदे म्हणाले कि,योगा या व्यायाम प्रकारात  प्राविण्य मिळविणे सोपी गोष्ट नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत, आहार, सातत्यपूर्ण कसरत गरजेची असते. सध्याच्या काळात योगाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे योगाची स्पर्धाही वाढत आहे. अशातच चापडगावच्या अनुराधाने योगा स्पर्धेत राष्ट्रीय पातळीपर्यंत मारलेली मजल कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे.