अहमदनगर दक्षिणेतील 10 रस्त्यांसाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजुर, खासदार  डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला आले मोठे यश !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या 10 रस्त्यांच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 25 कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.

25 crores fund approved for 10 roads in Ahmednagar South, MP Dr. Sujay Vikhe Patil's follow-up was great success,

खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नगर, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी, कर्जत, जामखेड व पारनेर तालुक्यांतील 10 रस्त्यांसाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. यासाठी विखे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला होता. या निधीमुळे अहमदनगर दक्षिण मतदार संघातील 7 तालुक्यांच्या रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.

सदर रस्त्यांच्या सुधारणेची तसेच लांबी-रूंदीकरणासह महत्त्वाच्या नदींवरील पुलांच्या बांधकामासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राज्य सरकार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून नगर तालुक्यातील वाळुज ते वाकोडी (प्र.जि.मा. 170 ) रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 3 कोटी आणि नगर- मनमाड रोड- नवनागापूर ते वडगांव गुप्ता (प्र.जि.मा. 190) रस्त्याच्या सुधारणेसाठी 3 कोटी, पारनेर तालुक्यातील रा.मा. 53 ते वडझिरे- पारनेर- सुपा- सारोळा- वाळकी- कौडगांव (रा.मा. 69) रस्ता सुधारणेसाठी 3 कोटी निधी मंजुर झाला आहे.

त्याचप्रमाणे राहुरी तालुक्यातील सोनगाव- सात्रळ- रामपूर- कोल्हार खु.- चिंचोली- गंगापूर- देवगाव- आंबी- अमळनेर- चांदेगाव (प्र.जि.मा.157) रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी १ कोटी, प्र.रा.मा. 8- राहुरी ते बारागाव- नांदुर- वावरथ ते ढवळपुरी (प्र.जि.मा. 217) रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पाथर्डी लातुक्यातही मिरी ते तिसगाव रस्त्याच्या (प्र.जि.मा. 33) रुंदीकरण व सुधारणेसाठी 3 कोटी, मोहरी ते तारकेश्वर गड (प्र.जि.मा. 46) रस्ता रुंदीकरण व सुधारणेसाठी 2 कोटी, तसेच श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव- खलु- कौठा- अजनुज- पेडगाव- शेडगाव (प्र.जि.मा. 03) रस्त्याच्या सुधारणेसाठी 3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

कर्जत तालुक्यातील रा.मा. 54- राशिन- अळसुंदे- निंबे- खातगांव- लोणी- मसदपूर- चापडगांव (प्र.रा.मा. 8) रस्ता सुधारणेसाठी 2 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली. जामखेड तालुक्यात आष्टी- डोणगांव- अरणगांव- फक्राबाद- नान्नज- सोनेगांव- खर्डा (रा.मा. 409) या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामांकरीता 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

या निधीमुळे मतदार संघातील 7 तालुक्यांची गतिमान विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांना भरीव यश लाभल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करून, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.