Environmental Awareness Cycle Tour | ‘ती’ च्या मानवतावादी धाडसाला जामखेडकरांचा सलाम

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Environmental Awareness Cycle Tour | पर्यावरण विषयक प्रश्नांनी एक तरूणी अस्वस्थ झाली. तिने मागील 11 महिन्यांपासून पर्यावरण जनजागृतीसाठी सायकलयात्रा सुरू केलीय. ती एकटीच निघालीय महाराष्ट्र दौर्‍यावर. आजवर तिने 13000 (तेरा हजार) पेक्षा किलोमीटरचा प्रवास पुर्ण केलाय. वयाच्या एकविसाव्या वर्षी भल्या भल्यांना लाजवेल असं असामान्य धाडस दाखवत ती राज्याच्या वेगवेगळ्या भागात जाऊन जनजागृती करत आहे. या असामान्य धाडसी तरूणीच्या मानवतावादी धाडसाला जामखेडकरांनी सलाम केलाय.

पर्यावरण जागृतीसाठी सायकल यात्रेवर निघालेल्या प्रणाली चिकटे या 21 वर्षीय तरुणीची सायकलयात्रा जामखेडमध्ये आली आहे. जामखेड महाविद्यालयाच्या वतीने तिचा सन्मान करण्यात आला.

welcome to pranali chiktes-environmental awareness cycle tour in jamkhed environmental travel

जामखेड महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या निमित्ताने एन एन एस व एन सी सी विभागाचे वतीने सायकलयात्री प्रणाली चिकटे या तरुणीचा सन्मान करण्यात आला.

प्रणाली चिकटे ही यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पुनवट येथील शेतकरी कुटुंबातील तरुणी आहे. पर्यावरण विषयक प्रश्नांनी अस्वस्थ होऊन त्याविषयी गांभीर्याने उत्तरे शोधून ती समाजासमोर आणण्यासाठी तीने सायकलयात्रा सुरू केली आहे.

welcome to pranali chiktes-environmental awareness cycle tour in jamkhed environmental travel

सुमारे ११ महिने सायकल प्रवास करत १३००० (तेरा हजार) किमी अंतर पार केले आहे. एकवीस वर्षे वयाच्या तरुणीचे हे धाडस असामान्य आहे. त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश फलके, उपप्राचार्य डॉ. सुनिल नरके, एनसीसीचे विभाग प्रमुख डॉ. गौतम केळकर, एन एस एस चे विभाग प्रमुख डॉ. एन.आर.म्हस्के, राजकुमार सदाफुले, किशोर सातपुते, ल. ना. होशिंग विद्यालयाचे क्रिडा शिक्षक प्रा. साळुंके सर व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित राहून सायकलयात्री प्रणालीचे उत्साहात स्वागत करुन तिच्या प्रवासानुभवाबद्दल संवादाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी पर्यावरण आणि स्त्री सक्षमीकरण या विषयावर प्रणालीने आपली परखड मते व्यक्त केली. समाज उपभोगाच्या मागे लागून स्वतः लाच एका महाकाय सिमेंटच्या गुहेत घेऊन निघाला आहे. अनागोंदी वापराने वीज, खनिजे, पाणी, माती,वृक्ष यांचे भीषण प्रश्न उभे ठाकले आहेत. वेळीच यावर उपाय योजना आवश्यक बनली आहे.  त्यासाठी तरुणांनी पुढाकार घेऊन कृती केली पाहिजे असे आवाहन प्रणालीने यावेळी केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. नरके सर यांनी तिच्या सायकलयात्रेला सदिच्छा देऊन तिचा सन्मान केला तर प्रा. साळुंके सर यांनी आभार मानले. कार्यक्रम सूत्रसंचलन प्रा. तुकाराम घोगरदरे यांनी केले.

यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी सायकलयात्री प्रणालीचे कौतुक करत विशेष सत्कार केला. त्यानंतर या पर्यावरण यात्रेला निरोप देण्यात आला.

 

web tital : welcome to pranali chiktes-environmental awareness cycle tour in jamkhed environmental travel