Treatment of visually impaired children | आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून दृष्टीदोष असणाऱ्या मुलांवर उपचार
कर्जत-जामखेडच्या शाळकरी मुलांना मिळणार नवी दृष्टी...
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : ‘कर्जत- जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून’ शाळकरी मुलांच्या नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. दृष्टिदोष आढळलेल्या ८३ मुलांवर पुण्यातील महंम्मदवाडी इथल्या एच. व्ही. देसाई हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्यात आले. Treatment of visually impaired children
नागरिकांच्या आरोग्य सेवेच्या सातत्यपूर्ण उपक्रमांचाच एक भाग म्हणून ‘कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या’ माध्यमातून मतदारसंघातील १७ वेगवेगळ्या शाळांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. Treatment of visually impaired children
ज्या मुलांमध्ये दृष्टिदोष आढळून आला होता अशा ६०० मुलांची पुन्हा नेत्र तपासणी करण्यात आली, त्यापैकी काही मुलांना चष्म्याचे वाटप करण्यात आले व दृष्टिदोष आढळलेल्या (Treatment of visually impaired children) ८३ मुलांना पुण्यात महंम्मदवाडी इथल्या एच. व्ही. देसाई हॉस्पिटलमध्ये (H. V. Desai Hospital Mahammadwadi) ऑपरेशनसाठी आणण्यात आलं होतं.आमदार रोहित पवार यांनी उपचारासाठी आणलेल्या मुलांची पालकत्वाच्या नात्याने हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेत मायेने विचारपूस केली. दरम्यान हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या इतरही रुग्णांची भेट घेऊन त्यांची ख्यालीखुशाली जाणून घेतली.
मुलांची भेट घेत असताना हॉस्पिटलचे चीफ मेडीकल डायरेक्ट डॉ. कर्नल (निवृत्त) मदन देशपांडे, कार्यकारी संचालक परवेज बिलीमोरीया, डायरेक्टर डॉ. राहुल देशपांडे, डॉ. सुचेता कुलकर्णी, डॉ. प्रवीण नारवाडकर यांच्यासह इतर डॉक्टर आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. (Treatment of visually impaired children)
कोरोनाच्या काळात शाळा बंद आहेत. सर्व मुले आपापल्या घरीच अभ्यास करत आहेत. यावेळी मुलांच्या आरोग्याची ही काळजी घेणे महत्वाचे आहे. आमदार रोहित पवार यांच्याद्वारे कर्जत- जामखेड येथील नागरिकांसाठी कोरोना काळात सॅनिटायझर/मास्क वाटप (राज्यभरात), हृदयरोग शस्त्रक्रिया शिबीर, स्वस्थ कन्या उज्ज्वल भविष्य उपक्रम, कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी कोविड सेंटर, रुग्णांच्या तत्काळ उपचारासाठीचा प्रवास सुकर होण्याकरिता रुग्णवाहिकांची सुविधा, घरपोच रुग्णसेवा या अनोख्या संकल्पनेतून ‘फिरता दवाखाना’, गोवंशिय जनावरांना होणाऱ्या लम्पि स्किन रोगावर उपचार, गुलाबी क्रांती कॅन्सर शिबिर आणि म्यूकरमायकोसिस तपासणी शिबीर अशा विविध कल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.(Treatment of visually impaired children)
‘कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या’ माध्यमातून लोकोपयोगी उपक्रम आयोजित करून लोकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. आमदार रोहित पवारांनी जनतेला आरोग्याच्या उत्तमोत्तम सुविधा पुरविण्यासाठी केलेले प्रयत्न केवळ त्यांच्या मतदारसंघापुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत. राज्यासह देशभरातील जनतेला मदत देण्यासाठी आमदार रोहित पवार कार्य करत आहेत.(Treatment of visually impaired children)
आजची शाळकरी मुले उद्याचे आपल्या देशाचे सुजाण नागरिक आहेत. महाराष्ट्राचे भवितव्य घडविण्यात या सर्वांचा वाटा असणार आहे. ज्यांच्या हातात देशाचे भविष्य आहे त्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे आरोग्य सुदृढ ठेवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. (Treatment of visually impaired children)
– रोहित पवार (आमदार, कर्जत-जामखेड)