तलाठी भरती 2023 संबंधी आजचे सर्वात मोठे अपडेट । Talathi Bharati 2023 latest update

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Talathi bharati 2023 : महसुल विभागात 4 हजार 644 तलाठी पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यासंदर्भात आज एक मोठे अपडेट समोर आले आहे. तलाठी पदभरती राबविण्यासाठी महसूल व वन विभागाने राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून अप्पर जमाबंदी आयुक्त तथा अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख पुणे यांची नेमणूक केली आहे. तलाठी भरती 2023 संदर्भात जमाबंदी आयुक्तांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. (State Upper Jamabandi Commissioner and Additional Director Land Records Anand Raite)

Today's biggest update regarding Talathi Bharti 2023, talathi bharati Latest update,

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण 4 हजार 644 पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) कार्यालयाकडून राज्यातील एकूण 36 जिल्हाच्या केंद्रावर ऑनलाइन (कंप्युटर बेस्ड टेस्ट) परीक्षा घेण्यात येणार आहे. तलाठी (गट-क) संवर्गातील पदांच्या सरळसेवा भरतीच्या अंमलबजावणीसाठी जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), नवीन प्रशासकीय इमारत दुसरा मजला, पुणे या ठिकाणी ‘तलाठी भरती कक्ष’ सुरु केला आहे.

Today's biggest update regarding Talathi Bharti 2023, talathi bharati Latest update,

तलाठी भरती कक्षामध्ये पद भरती प्रक्रिया राबविण्याकरीता सामान्य प्रशासन विभागाच्या 4 मे 2022 आणि  21 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयामधील तरतूदी व मार्गदर्शक सूचनांनुसार नमूद कंपन्यांची व्यवहार्यता तपासून कंपनीची निवड करणे, एजन्सीने निवडलेले परीक्षा केंद्र क्षेत्रीय यंत्रणेमार्फत तपासणे, पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम तयार करुन निवड केलेल्या कंपनीसोबत पदभरती प्रक्रियेसंबंधित सामंजस्य करार करणे, परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेचे आयोजन, परीक्षेचा निकाल, शिफारस झालेल्या व शिफारस न झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, पदभरतीसंबंधीत उमेदवारांकडून आक्षेप व तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा तांत्रिक अडचणी उद्भवल्यास त्यासंबंधित कंपनीशी पत्रव्यवहार करुन अडचणींचे निराकरण करणे आदी प्रकारची कामे होणार आहे.

सदर तलाठी भरतीसाठी सामान्य नागरिकांसाठी व प्रक्रियेमध्ये सहभागी होणार्‍या उमेदवारांसाठी सूचना https://mahabhumi.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे राज्याचे अप्पर जमाबंदी आयुक्त तथा अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख आनंद रायते (Anand Raite) यांनी कळविले आहे.