तर मग ठरलं !  दहावी बारावीच्या परीक्षांसंबंधी मोठी बातमी

जामखेड टाईम्स वृत्तसेवा ।  राज्यात दहावी (ssc) आणि बारावीच्या (hsc) परीक्षा ऑनलाईन व्हाव्यात या मागणीने राज्यात वातावरण तापलेलं असतानाच आता या परीक्षांसंदर्भात (exam) एक मोठी बातमी आता समोर आली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑनलाईनच (offline) होणार आहेत यावर राज्य परीक्षा मंडळ ठाम आहे.(State Examination Board)

राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन (online exam) घेण्यात याव्यात, तसेच अभ्यासक्रम पुर्ण न झाल्याने परीक्षा एक महिना पुढे ढकलण्यात याव्यात या मागण्यांच्या विद्यार्थ्यांनी राज्यात ठिकठिकाणी अंदोलन केले होते. हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक (Hindustani Bhau) यांच्या चिथावणीमुळे राज्यातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. पाठक याला अटक करण्यात आली आहे.

राज्यात ऑनलाईन परीक्षा व्हाव्यात अशी मागणी जोर पकडू लागल्याने परीक्षांचं काय होणार याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते. परंतू राज्य परीक्षा मंडळाकडून मात्र यावर कुठलेच संकेत मिळाले नव्हते. मात्र आता यासंबंधी परीक्षा मंडळाने ऑनलाईन परीक्षांची मागणी फेटाळून लावत ठरलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

11 फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षांकरिता लागणारे साहित्य जिल्हा केंद्रावरून वाटपाला सुरूवात होणार आहे. बुधवारी राज्य शिक्षण मंडळाची विभागीय मंडळासोबत ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार 75 टक्के अभ्यासक्रमावर लेखी, तर 40 टक्के अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिक परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठीचे मुख्य परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.विद्यार्थ्यांच्या शंका निरसन आणि मार्गदर्शनासाठी मंडळाकडून हेल्पलाईन सुरू केली जाणार आहे.

12वीची परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या काळात ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे तर दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत घेण्यात येतील. शाळा तिथे परीक्षा केंद्र असणार आहे. परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी झिगझॅग पध्दत असणार आहे. परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना वाढीव कालावधी देण्यात येणार आहे. विद्यार्थांना वाढीव अर्धा तास मिळणार आहे.100 मार्कांसाठी 30 मिनिटांचा तर 40 मार्कांसाठी 15 मिनटांचा वाढीव कालावधी दिला जाणार आहे. राज्यात 30 हजार परीक्षा केंद्र असणार आहेत.