- Advertisement -

Lockdown : आदेश आला रे…पुन्हा एकदा शाळा होणार लाॅकडाऊन! ( Ahmednagar All School Lockdown once again )

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकुळ सुरू आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आठवडेबाजार रद्द करण्याचा निर्णय मागील आठवड्यात घेतल्यानंतर आता प्रशासनाने आणखीन एक पाऊल उचलले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळता सर्व सरकारी व खाजगी शाळा बंद (Lockdown) ठेवण्याचे आदेश अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज दिनांक 29 मार्च 2021 रोजी काढले आहेत. (The administration has taken another step after the decision was taken last week to cancel the all-week market in Ahmednagar district to curb the rising incidence of corona. Ahmednagar District Collector has issued orders to close all government and private schools in Ahmednagar district except Class X and XII on March 29, 2021.)

अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली होती. या बैठकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत चिंता व्यक्त करत तातडीने कठोर उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. ही बैठक संपुन काही तास उलट नाही तोच जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील शाळा बंदचा ( School Lockdown) काढत कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनांच्या संदर्भात जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर आले असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. जनतेने कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना राबवण्यात बेफिकरपणा दाखवल्यास जिल्हा प्रशासनाने कोणत्याही क्षणी जिल्ह्यात टाळेबंदी जाहीर करू शकते असेच संकेत आता प्रशासनाकडून मिळत आहेत. ( Ahmednagar Guardian Minister Hasan Mushrif held a Corona Review Meeting at the District Collector’s Office today.Just a few hours after the meeting, District Collector Rajendra Bhosale issued an order to close schools in the district and once again showed that the district administration was in action mode with regard to Corona preventive measures. There are indications from the administration that the district administration may declare a lockout in the district at any time if the people of the district show indifference in implementing corona prevention measures.)

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यातील इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळता सर्व सरकारी व खाजगी शाळा दिनांक 30 मार्च 2021 पासून दिनांक 30 एप्रिल 2021 अखेर  बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (School Lockdown) यामुळे पुढील महिनाभर शाळांमधील चिमुकल्यांचा किलबिलाट थांबणार आहे. (Ahmednagar District Collector has issued orders to close all government and private schools in Ahmednagar district except Class X and XII on March 29, 2021)

देशात कोरोनाचा वाढता वेग चिंताजनक

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 68,020 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 291 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील  कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,20,39,644 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1,61,843 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे देशात कोणत्याही क्षणी लाॅकडाऊन (Lockdown) जाहीर केला जाऊ शकतो असे तज्ञांचे मत आहे.

महाराष्ट्रातील 25 जिल्हे धोकादायक वळणावर

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अशा  देशातील 46 जिल्ह्यांकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे ज्यात या महिन्यात संक्रमणाच्या एकूण प्रकरणांपैकी 71% आणि या प्रकरणांमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या 69% टक्के नोंदविण्यात आली आहेत. आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव अधिक आहे. देशात मागील एका आठवड्यात आढळून आलेल्या प्रकरणांपैकी 59.8 टक्के रुग्ण याच जिल्ह्यांमधील आहेत असं म्हटलं आहे.