आपले सरकार सेवा केंद्र चालक प्रशासनाच्या रडारवर, प्रांताधिकारी अजित थोरबोलेंनी दिले महत्वाचे आदेश

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | आपले सरकार सेवा केंद्र व सर्वसामान्य सेवा केंद्र (CSC)द्वारे वितरीत केल्या जाणाऱ्या दाखल्यांसंदर्भात एक महत्वाची बातमी आता समोर आली आहे. (radar on Aapale Sarkar Seva Kendra administration, Prantadhikari Ajit Thorbole gave important orders)

आपले सरकार सेवा केंद्र व सर्वसामान्य सेवा केंद्र (CSC)द्वारे वितरीत केल्या जाणारे दाखल्यांसाठी वाढीव दराने पैसे अकारले जात असल्याचे सातत्याने बोलले जात होते. यावर प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे.

शासकीय दरपत्रकानुसारच दाखल्यांचे वाटप करण्याचे आदेश प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी जारी केले आहेत. हे आदेश कर्जत उपविभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व तालुक्यांसाठी लागू असणार आहेत.

कर्जत-जामखेड उपविभागातील आपले सरकार सेवा केंद्र व सर्वसामान्य सेवाकेंद्र (CSC) यांची नुकतीच ऑनलाईन बैठक पार पडली त्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

सेवा केंद्र चालकांना करावे लागणार याचे पालन

1) शासनाने निश्चित केलेले दरपत्रकानुसार सर्वसामान्य नागरिकांकडून दाखल्यांची रक्कम आकारणी करावी

2) दरपत्रक हे सर्व केंद्रावर लावणे बंधनकारक राहील.

3) सदर दरपत्रकाप्रमाणे संबंधीत संचालक दाखल्यांसाठी आकारणी करीत नसल्याचे आढळून आल्यास संबंधीताविरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.

दाखल्यांसाठीचे शासकीय दरपत्रक खालीलप्रमाणे

7/12 उताऱ्यासाठी – 24 रुपये

सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र – 34 रुपये

उत्पन्नप्रमाणपत्र – 34 रुपये

वय अधिवास प्रमाणपत्र – 34 रुपये

नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र – 34 रुपये

जातीचे प्रमाणपत्र – 34 रुपये

शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त आकारणी केल्यास संबंधित तालुक्यातील तहसील कार्यालयात नागरिकांनी लेखी तक्रार करावी. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच उपविभागातील सर्व सेवा केंद्राचे काम कशाप्रकारे चालु आहे याची तपासणी मंडळ अधिकारी यांचे मार्फत महिन्यातून एकदा केली जाईल अशी माहिती प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी दिली.