रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय जगताप यांचे निधन

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । कर्जत शहरातील रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त शिक्षक कै दत्तात्रय खंडू जगताप यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६५ वर्षाचे होते. (Rayat Shikshan Sanstha Retired teacher Dattatraya Jagtap passed away)

शहरात आणि नवसरवाडी परिसरात ते “नाना” नावाने सर्वपरिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

कै दत्तात्रय जगताप यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शिंदे, टाकली खंडेश्वरी, कर्जत, शिरूर आणि जासई (जिल्हा रायगड) या ठिकाणी सेवा बजावली होती. जासई याच ठिकाणी ते ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले होते.

त्यांच्यावर कर्जत येथील अमरधाम-मध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.