सुळ,शेख, खाडे या तिघांच्या संशोधनाने गाजली राष्ट्रीय नवसंशोधन स्पर्धा : जवळ्याचा झाला राष्ट्रीय पातळीवर सन्मान ! (National research competition won by the research of Sul, Sheikh and Khade: Nearby, national level honor)
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : महात्मा गांधींच्या विचारांना अभिप्रेत असलेल्या ग्रामस्वराज्य निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वावं देऊन त्यांच्यातून भविष्यात चांगले संशोधक,शास्त्रज्ञ निर्माण करण्याच्या हेतूने आयोजीत राष्ट्रीय स्पर्धेत जवळ्यातील विद्यार्थ्यांनी तिसरा क्रमांक पटकावला. या यशामुळे जामखेड तालुक्याचे नाव देशपातळीवर झळकले आहे. (National research competition won by the research of Sul, Sheikh and Khade: Nearby, national level honor)
मुंबईच्या मराठी विज्ञान परिषद आणि गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच राष्ट्रीय नवसंशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतजामखेड तालुक्यातील जवळा येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल जाहिर झाला असुन यात राष्ट्रीय पातळीवरचा तिसरा क्रमांक जवळा येथील तिघा चिमुकल्यांनी पटकावत घवघवीत यश मिळवले आहे. (National research competition won by the research of Sul, Sheikh and Khade: Nearby, national level honor)
श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील इयत्ता पाचवी ते सातवी या गटातील इयत्ता सहावीतील सुफीयान जाकिर शेख ,अर्थव बापू खाडे आणि साई संतराम सूळ या विद्यार्थ्यांनी गणित विषयाचे अंकांचे कोडे हे मॉडेल तयार करुन ऑनलाइन सादरीकरण केले. या मॉडेलचा भारतातून तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. (National research competition won by the research of Sul, Sheikh and Khade: Nearby, national level honor)