MRTI : अल्पसंख्याक समाजासाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय, अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यास मान्यता !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’, ‘अमृत’ या संस्थांच्या धर्तीवर ‘अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे ‘एमआरटीआय’ची स्थापना करण्याचा मोठा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी घेण्यात आला. राज्यातील अल्पसंख्याक समुहासाठी महायुती सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

MRTI, A big decision of Mahayuti government for minority community, approval to establish minority research and training institute,

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. अल्पसंख्याक स्थापन करण्यात येणाऱ्या ‘अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी एकूण ११ पदे निर्माण करण्यात येतील. त्याचप्रमाणे या संस्थेच्या वेतन, कार्यालयीन खर्च, मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी, प्रशिक्षणासाठी एकूण ६ कोटी २५ लाख रुपयांच्या खर्चासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. 

राज्यात मुस्लिम, जैन, बौध्द, ख्रिश्चन, ज्यु, सिख, पारशी हे अल्पसंख्याक नागरिक आहेत.  त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासाशी संबंधित समस्यांचा या संस्थेमार्फत अभ्यास करण्यात येईल. महायुती सरकारने अल्पसंख्याक बांधवांसाठी महत्वपूर्ण पाऊल उचलल्याने या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.