Market Closed : ‘या’ तारखेपासुन जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार होणार बंद – जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय ( The market will be closed for all the weeks in the district from this date – the decision of the District Collector)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक वाढू लागल्याने जिल्हावासियांच्या चिंता आता वाढल्या आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक थोपवण्यासाठी प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जिल्ह्यात लाॅकडाऊन होणार का ? याबाबत वेगवेगळी मतमतांतरे चर्चिले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. (The market will be closed for all the weeks in the district from this date – the decision of the District Collector)

जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी यासंदर्भात आज एक आदेश काढला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार 29 मार्च ते 15 एप्रिल पर्यंत बंद ठेवली जाणार आहेत. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सदर आदेशाचे कोणी उल्लंघन केल्यास साथरोग कायद्याने कारवाई केली जाणार आहे असे आदेशात म्हटले आहे. The market will be closed for all the weeks in the district from this date – the decision of the District Collector