प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर भरदिवसा गोळीबार, गोळीबाराच्या घटनेने नांदेड हादरले

नांदेड, दि 5 एप्रिल : नांदेडमधील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी भर रस्त्यात गोळीबार करण्याची घटना घडली. या घटनेत संजय बियाणी (Sanjay Biyani) हे जखमी झाले आहेत. संजय बियाणी हे नांदेडमधील मोठे प्रस्थ असून खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. (Famous builder Sanjay Biyani was fired upon all day long, Nanded was shaken by the incident of firing)

संजय बियाणी हे घराबाहेर निघताना त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार (Nanded Crime) करण्यात आला. दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर गोळी झाडल्याचा आरोप आहे. ही घटना नांदेड शहरातील आनंदनगर भागात घडली.

गोळीबारात संजय बियाणी गंभीर जखमी झाले आहेत. बियाणी यांच्यावर कोणत्या कारणातून गोळीबार करण्यात आला ? हा हल्ला कोण केला, याचा नांदेड पोलिस वेगाने तपास करत आहेत.भरदिवसा घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने नांदेड हादरले आहे.

नांदेडमध्ये बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर त्यांच्याच घरासमोर अज्ञात आरोपींनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झालाय. या दोन्ही जखमींवर नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने शहरात तणावाचे वातावरण पसरलं आहे.

दरम्यान, गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झालीय का याचा शोध घेणे सुरू आहे. नांदेडमध्ये गावठी पिस्तुलांचा सुळसुळाट झाला असून गोळीबाराच्या घटना आता अगदीच सामान्य होत चालल्या आहेत, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. आजच्या या घटनेनंतर शहरातील व्यापारी वर्गात मोठी दहशत पसरलीय.