Maharashtra School Reopen | 1 ली ते 12 वी शाळा पुन्हा सुरू होणार ! तारीख ठरली, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यातील शाळा पुन्हा सुरू व्हाव्यात यासाठी सातत्याने मागणी होत आहे. त्यातच शाळा सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कालच संकेत दिले होते.त्यानुसार राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. (Maharashtra School Reopen Education Minister Varsha Gaikwad said school will start from 24 January with covid Protocols)
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कालचं त्यासंदर्भातील फाईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली होती.शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर द्यावेत, असं सगळ्यांचे मत होते. त्यानुसार गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना कळवले होते.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शाळा 24 जानेवारीपासून सुरु करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती. त्या फाईलला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे अशी माहिती गायकवाड यांनी दिली आहे.
ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी असेल तिथं 24 जानेवारी पासून शाळा सुरु होतील. शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीचं पालन करुन निर्णय घेतील.
- जामखेड : चोंडी येथील अंजली संतोष कुरडुले हिने पटकावला तालुकास्तरीय स्पर्धेत पहिला क्रमांक !
- frist time mla in maharashtra 2024 list : महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४मध्ये पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची यादी
- Devendra fadnavis cm : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कोण घेणार शपथ, महत्वाची अपडेट आली समोर
- Ram Shinde News : आमदार राम शिंदे ठरले सर्वाधिक मते घेऊन सर्वात कमी फरकाने पराभूत झालेले राज्यातील क्रमांक एकचे उमेदवार
- karjat Jamkhed Vidhan Sabha Election 2024 Results Live Updates : कर्जत जामखेड विधानसभा निवडणूक 2024 निकाल लाईव्ह अपडेट्स
सोमवारी 24 जानेवारीपासून शाळा सुरु होतील. पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होतील पूर्व प्राथमिक वर्ग देखील सुरु होतील, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
मुलांचं आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता हे आमचं प्राधान्य राहिलेलं आहे. स्थानिक स्थितीवर लक्ष ठेवलं पाहिजे. कोरोना स्थितीचा आढावा घेतला पाहिजे. शाळा सुरु करत असताना आपण गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग पाहत आहोत. त्यामुळं शाळा सुरु करत असताना नियमावलीचं पालन केलं पाहिजे. पूर्णपणे काळजी घेऊन शाळा सुरु करण्यात याव्यात असं, वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
पालकांची समंती असल्यानंतर विद्यार्थी शाळेत येतील. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, याची काळजी आम्ही घेत आहोत.
निवासी शाळा सुरु करण्यासंदर्भात आम्ही येणाऱ्या काळात निर्णय घेणार आहोत. निवासी शाळा किंवा वसतीगृहात गेल्या काळात विद्यार्थ्यांना कोरोना झाला होता. त्यामुळं निवासी शाळा सुरु करण्यासंदर्भात येत्या काळात आम्ही निर्णय घेणार आहोत.
शाळा सुरु करण्यासाठी आम्ही शिक्षणतज्ज्ञ, टास्क फोर्स आणि शिक्षण विभागातालील अधिकाऱ्यांशी चर्चा करत होतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरु करण्याच्या फाईल वर सही केली आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.