मुंबईत सामूहिक हत्याकांडाचा कट उघड! भायखळा मोहरम मिरवणुकीत १५ हजार जणांना मारण्याचा होता प्लॅन; आरोपीचा धक्कादायक खुलासा, महाराष्ट्रात उडाली खळबळ
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मुंबईच्या भायखळा (Byculla) परिसरातून संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोहरमच्या मिरवणुकीत (Muharram Procession) घडवून आणला जाणारा मोठा नरसंहार उधळून लावला आहे. विषारी गोळ्या वाटून तब्बल १५ ते ३० हजार लोकांना मारण्याचा भयानक कट उघडकीस आला असून, या प्रकरणी मुख्य आरोपी फैयाज निसार हुसेन प्रेमजी (Faiyaz Nisar Hussain Premji) याला रंगेहात अटक करण्यात आली आहे. (MumbaiNews)

मोहरम मिरवणुकीत नेमकं काय घडलं?
भायखळा येथे मोहरमची मिरवणूक सुरू असताना एक संशयित व्यक्ती ‘पेनकिलर’ (वेदनाशामक गोळ्या) आणि चॉकलेटच्या नावाखाली नागरिकांना कॅप्सूल वाटत होता. या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे काही तरुणांची प्रकृती अचानक बिघडली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ हालचाली करत घटनास्थळी धाव घेतली आणि संशयिताला ताब्यात घेत त्याच्याकडील संशयित कॅप्सूलचा मोठा साठा जप्त केला.
“मला १५ हजार लोकांना मारायचं होतं…”
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव फय्याज निसार हुसेन प्रेमजी असे आहे. पोलीस चौकशीत या आरोपीने अत्यंत खळबळजनक कबुली दिली आहे.”मला कमीत कमी १५ हजार लोकांना मारायचं होतं,” असे फय्याजने तपासात सांगितले.
मोहरम मिरवणुकीदरम्यान पाणी, सरबत, अन्नपदार्थांचे वाटप करण्यासाठी पोलिसांनी अगोदरच आलेल्या अर्जावरून परवानग्या दिल्या होत्या. त्यात प्रेमजी हा कॅप्सूल वाटपासाठी विनापरवानगी आल्याने पोलिसांच्या नजरेत आला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ काही कॅप्सूल सापडल्या. पोलिसांनी तातडीने कारवाई केल्यामुळे कॅप्सूलचे पुढील वितरण थांबले, असे पोलिस उपायुक्त जयंत मीना यांनी सांगितले.
झिंक फॉस्फाइड का?
कलिंगड खाल्ल्याने पायधुनीच्या डोकाडिया कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला होता. हे मृत्यू कलिंगडात आढळलेल्या झिंक फॉस्फाइडमुळे झाल्याचे फोरेन्सिक तपासात उघड झाले होते. त्या बातम्या फय्याजने वाचल्या. त्यातूनच त्याने कॅप्सूलमध्ये मिसळण्यासाठी झिंक फॉस्फाइडची निवड केली का? याबाबतही तपास सुरू आहे. झिंक फॉस्फाइडचा वापर उंदीर मरण्यासाठी होतो. ते सहज उपलब्ध होते म्हणून याचा वापर केल्याचे तो पोलिसांना सांगत आहे.
महिलेचीही सतर्कता
मिरवणुकीत सहभागी एका महिलेला संशय आल्याने तिने कॅप्सूल वाटणाऱ्याकडे चौकशी केली. पण, संशय दूर न झाल्याने त्या महिलेने एक कॅप्सूल उघडून बघितली असता तिला त्यात राखाडी रंगाची पावडर आढळली. यामुळे महिलेचा संशय अधिक बळावला आणि तिने वेळ न घालवता तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
फय्याज मानसिक रुग्ण असल्याचा पोलिसांचा अंदाज
प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी फय्याज मानसिक आजाराने ग्रस्त असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो व्यवस्थित झोपलेला नाही. तसेच, वैद्यकीय सल्ल्याविना तो स्वतःच्या मनाने विविध औषधांच्या गोळ्या घेत असल्याचेही उघड झाले आहे. याशिवाय, समाजातील एका विशिष्ट घटकाविषयी त्याच्या मनात तीव्र द्वेषाची भावना असल्याची माहितीही पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आल्याचे समजते.
कोण आहे फय्याज प्रेमजी?
शिक्षण व पार्श्वभूमी: फैयाज निसार हुसेन प्रेमजी असे संशयिताचे नाव असीन त्याने बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे (BBA) शिक्षण घेतले असून, त्याच्या वडिलांची पेंटची कंपनी आहे. पुण्याच्या विमाननगर परिसरात तो राहायला आहे. त्याचे लग्न झाले असून पत्नी त्याच्यासोबत राहत नसल्याचे समजते.
इराण प्रवास: त्याची आई आणि बहीण इराणमध्ये राहते. गेल्यावर्षी तो नोकरीसाठी इराण, इराकमध्ये जाऊन आला होता. तेथून तो पुण्यात परतला होता.
कसा रचला कट?: फय्याजने १५ दिवसांपूर्वी मुंबई गाठली. डोंगरीतील हॉटेलच्या रूममध्येच ५० किलो झिंक फॉस्फाइड आणि ३० हजार अँटीबायोटिकच्या कॅप्सूल ऑनलाईन मागवल्या. त्याने कॅप्सूलमध्ये एक-एक ग्रॅम झिंक फॉस्फाइड भरले.
सगळे सुरळीत असतानाच अचानक तो हिंसक वृत्तीकडे का वळला? तो कुणाच्या संपर्कात आला का? यामागे कुठले दहशतवादी कनेक्शन आहे का? असा सर्व बाजूंनी मुंबई पोलीस तपास करत आहेत.
मुंबईच्या इतिहासातील सर्वांत मोठा विषप्रयोगाचा कट मुंबई पोलिसांनी उधळून लावला आहे. शुक्रवारी भायखळा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मोहरमच्या मिरवणुकीत सामील झालेल्या भाविकांना उंदीर मारण्याच्या विषाच्या (झिंक फॉस्फेट) गोळ्या वाटण्यात येत होत्या.हा प्रकार वेळीच लक्षात आल्यावर पेनकिलरच्या नावाखाली विषाच्या गोळ्या वाटणाऱ्या फैयाज प्रेमजी याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याच्याकडून १४ हजार ९०० कॅप्सूल जप्त केल्या. भाविकांना विषाच्या गोळ्या देण्यामागे फैयाज याचा नेमका कोणता उद्देश होता याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. भायखळा येथील मिरवणुकीत हजारोंच्या गर्दींमध्ये एक तरुण कॅप्सूल वाटत होता. मिरवणुकीत जखमा करून घेणाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून हर्बल पेन किलर गोळ्या असल्याचे तो सांगत होता. याचदरम्यान सलमान सय्यद याला उलट्या होऊ लागल्याने पोलिसांना संशय आला आणि त्यांनी फैयाज याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या कॅप्सूलची तपासणी केली. दरम्यान, फैयाज याने ५० किलो झिंक फॉस्फेस्टची पावडर आणि ३० हजार रिकाम्या कॅप्सुलची ऑनलाइन ऑर्डर दिली होती.
गर्दीत वाटल्या जाणाऱ्या गोळ्या विषारी असल्याचे समजल्यावर पोलिसांनी गर्दीमध्ये जाऊन स्पीकरवर घोषणा केली. यामुळे फैयाज याने वाटलेल्या कॅप्सूल अनेकांनी घेण्याचे टाळले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनेकांचे प्राण वाचले. पुण्यातील विमाननगर परिसरात राहणारा फैयाज प्रेमजी हा १५ दिवसांपूर्वी मुंबईत आला होता. डोंगरी येथील एका हॉटेलमध्ये तो वास्तव्यास होता, असे तपासातून समोर आले आहे. भाविकांवर विषप्रयोग करण्याचा कट त्याचा एकट्याचाच आहे की, अन्य कुणाचा यामध्ये सहभाग आहे याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी अटक केलेल्या फैयाज याने इराण आणि इराकची वारी केल्याचे उघडकीस आली आहे. उच्चशिक्षित असलेल्या फैयाज याने केलेले हे कृत्य घातपात आहे की दहशतवादी कट याचा तपास पोलिस करीत आहेत. कुणाशी प्रेरित होऊन त्याने हे पाऊल उचलले का? याबाबतही चौकशी केली जात आहे. यासाठी त्याचा मोबाइल, आर्थिक व्यवहार याची बारकाईने तपासणी केली जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या फैयाज याने इराण आणि इराकची वारी केल्याचे उघडकीस आलं आहे. उच्चशिक्षित असलेल्या फैयाजन केलेले हे कृत्य घातपात आहे की, दहशतवादी कट या तपास पोलिस करीत आहेत. कुणाकडून प्रेरित होऊन त्याने हे पाऊल उचलले का, याबाबतही चौकशी केली जात आहे. यासाठी त्याचा मोबाइल, आर्थिक व्यवहार याची बारकाईने तपासणी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.