Mahesh Gaikwad Health : महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक की सुधारणा ? डाॅक्टरांनी दिली महत्वाची अपडेट, जाणुन घ्या सविस्तर !

मुंबई  : भाजपा आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad mla) यांनी उल्हासनगर येथे कल्याण पुर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) व राहूल पाटील यांच्यावर पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता. या घटनेत जखमी झालेल्या गायकवाड व पाटील (Rahul Patil) यांच्यावर उपचार सुरु आहेत. दोघा जखमींच्या प्रकृतीबाबत (Health Update) आता मोठे अपडेट समोर आले आहे.

Is Mahesh Gaikwad health condition alarming or improving? Important update given by doctor, know in detail,

उल्हासनगर (Ulhasnagar) येथील एका पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्या बेछूट गोळीबार करत प्राणघातक हल्ला चढवला होता. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेने महाराष्ट्रासह संपुर्ण देशभर खळबळ उडवून दिली आहे. ही घटना 2 फेब्रुवारी 2024 रोजी घडली होती. मुलाला मारहाण झाल्याच्या रागातून आपण गोळीबार केला, असा दावा आमदार गणपत गायकवाड यांनी घटनेनंतर केला. या घटनेतील आरोपी आमदार गणपत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या ते पोलिस कस्टडीत आहेत.

आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड व राहुल पाटील यांची प्रकृती चिंताजनक आहे की त्यात सुधारणा झाली आहे? याबाबत आता डाॅक्टरांनी महत्वाची अपडेट दिली आहे. राहूल पाटील यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तर महेश गायकवाड यांची प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आहे. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत. गायकवाड यांच्या प्रकृतीत अधिक सुधारणा व्हावी यासाठी डाॅक्टरकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. महेश गायकवाड यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती खासदार डाॅ श्रीकांत शिंदे यांनी जारी केली आहे.

सोमवारी सकाळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड यांची ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीची फोटो आता समोर आले आहेत. यामध्ये महेश गायकवाड खासदारांशी बोलत असल्याचे दिसत आहे. हा फोटो पाहून कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. महेश गायकवाड हे लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

उल्हासनगर गोळीबारात जखमी महेश गायकवाड व राहूल पाटील यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपीटर हाॅस्पीटलला भेट दिली. गायकवाड व पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. उल्हासनगरमधील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे, अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

सदर घटनेनंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हिललाईन पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्यासह तीन जणांना अटक देखील केली आहे. दरम्यान, गायकवाड यांच्या अटकेनंतर आता त्यांची आमदारकी जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ.श्रीकांत दादा शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम काल रद्द केले. खासदार शिंदे हे गेल्या तीन दिवसांपासून महेश गायकवाड यांच्या तब्येतीची काळजी घेत ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये थांबले आहेत, अशी माहिती मंगेश चिवटे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.

हिललाईन पोलीस ठाण्यात जमिनीच्या वादातून एकत्र जमले असताना मुलाला मारहाण झाल्याने संतप्त झालेल्या आमदार गणपत गायकवाड यांनी स्वसंरक्षणाचे कारण सांगून महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्यावर शुक्रवारी गोळीबार केला होता. यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. महेश गायकवाड यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी रुग्णालयाला भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

राहुल पाटील हा अंबरनाथ येथील बैलगाडा शर्यत प्रकरणातील आरोपी आहे. चैनू जाधव हा नेवाळी पोलीस हल्ला प्रकरणातील आरोपी आहे. आमदार गणपत गायकवाड, महेश गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये बहुतांश गन्हेगार मंडळींचा भरणा असल्याचे या घटनेनंतर उघडकीला आले आहे. गुन्हेगार असूनही राजकीय वरदहस्तामुळे आरोपी मंडळी बिनधास्तपणे पोलिसांसमोर दांडगाई करत असल्याच्या तक्रारी आहेत. गोळीबार प्रकरणानंतर राजकीय आश्रय घेतलेल्या गुन्हेगारांच्या नांग्या ठेचण्यात पोलिस यशस्वी होतात की नाही याकडे ठाण्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.