हृदयद्रावक : कालिका फर्निचर दुकानाला भीषण आग, पाच जणांचा होरपळून मृत्यू, नेवासा फाटा येथील घटनेने महाराष्ट्र हळहळला
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : नेवासा फाटा येथे रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास कालिका फर्निचर दुकानाला भीषण आग लागली. या दुकानाच्या पाठीमागील बाजूस राहणारे मयुर रासने यांच्या कुटूंबाला आगीने वेढले.या घटनेत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मध्यरात्री झोपेत असलेल्या रासने कुटुंबावर काळाने घाला घातला. या हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटनेमुळे महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेत मयुर अरूण रासने (वय ३६) त्यांची पत्नी पायल रासने (वय ३०) अंश रासने (वय ११) चैतन्य रासने (वय ०६) सिंधुताई चंद्रकांत रासने (वय ८५) या पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला. तर मयुर रासने यांचे आई वडिल बाहेरगावी गेले असल्याने ते बचावले.
नेवासा पोलीस ठाणे हद्दीतील नेवासा फाटा परिसरात मयूर रासने यांचे फर्निचरचे दुकान आहे. दुकानाच्या वरच मयूर रासणे हे त्यांच्या पत्नी व मुलासह राहतात. सोमवारी मध्यरात्री या दुकानाला भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की वरच्या मजल्यावर झोपलेल्या रासने कुटुंबावर काळाने त्यांच्यावर घाला घातला.
या दुर्घटनेत मयूर अरुण रासने त्यांची पत्नी पायल मयूर रासने, मुलगा अंश मयूर रासने, धाकटा मुलगा चैतन्य मयूर रासने व आजी सिंधुताई चंद्रकांत रासने या पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला.तर या घटनेत २५ वर्षीय यश किरण रासने हा जखमी झाला आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या भीषण दुर्घटनेने नेवासा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अहिल्यानगरमधील नेवासामध्ये आगीमध्ये होरपळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नेवासा येथील फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागली होती, त्यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला.मध्यरात्री सर्वजण झोपेत असताना ही दुर्दैवी घटना घडली.फर्निचरच्या दुकानाला नेमकी कशामुळे आग लागली? याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशामन दल आणि पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. अग्निशामन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले, पण तोपर्यंत एकाच कुटुंबातील पाच जणांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला होता.
नेवासा फाटा येथील कालिका फर्निचर दुकानाला रविवारी मध्यरात्री एक वाजताच्या भीषण आग लागली. फर्निचर असल्याने आगीने रौद्ररूप घेतले. आग लागल्यानंतर धुराचे लोट मोठ्या प्रमाणात हवेत होते.आगीत फर्निचरचे दुकान भस्मसात झाले. या घटनेचा नेवासा पोलिस पुढील तपास करत आहेत.