Gram Panchayat Election 2022 | महाराष्ट्रातील 271 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, अहमदनगरमधील 15 ग्रामपंचायतींचा समावेश

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Gram Panchayat Election 2022 | राज्यात एकिकडे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याने राज्यातील सत्तासंघर्ष तीव्र बनला आहे. तर दुसरीकडे राज्यातील 271 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.पुढील महिन्यापासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राजकीय धुळवड रंगताना दिसणार आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सन 1959 चा मुंबई अधिनियम क्रमांक 3) मधील कलम 10 अ पोटकलम (4) मधील अधिकारांचा वापर करत राज्य निवडणूक आयोगानं 271 ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत. पाच जुलै रोजी आचारसंहिता लागू होणार आहे. चार ऑगस्ट रोजी मतदान, तर पाच ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. यामुळे पुढील महिन्यापासून ग्रामपंचायत हद्दीतील राजकीय रणधुमाळी गाजणार आहे.

ठाकरे सरकारचं काय होणार ? आकडे काय सांगतायेत? शिंदे गटाचा गेम होणार?

राज्यात 28,813 ग्रामपंचायती आहेत. राज्यातील 62 तालुक्यातील 271 ग्रामपंयचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू असणार आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात यावी, असेही निवडणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल.या निवडणुकीदरम्यान कोरोना नियमांचं पालन करण्यात यावे, असेही सांगण्यात आले आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायतींच्या निवडणूका ?

 • नाशिक – 40
 • धुळे – 52
 • जळगाव – 24
 • अहमदनगर – 15
 • पुणे – 19
 • सोलापूर – 25
 • सातारा – 10
 • सांगली – 1
 • औरंगाबाद 16
 • जालना – 28
 • बीड – 13
 • लातूर -9
 • उस्मनाबाद – 11
 • परभणी – 3
 • बुलढाणा – 5

अहमदनगर जिल्ह्यात 15 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूका होणार आहेत. या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. (Gram Panchayat Election 2022, Election program 271 gram panchayats in maharashtra announced, Includes 15 Gram Panchayats in Ahmednagar)

तालुकानिहाय आकडेवारी खालील प्रमाणे

 • नगर तालुका – 3
 • कर्जत – 3
 • श्रीगोंदा – 2
 • शेवगाव – 1
 • राहुरी – 3
 • संगमनेर- 3