(Good news for students in rural areas: 8th to 12th schools will start from this date) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर : या तारखेपासून सुरू होणार 8 वी ते 12 वीच्या शाळा

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा ! (Good news for students in rural areas: 8th to 12th schools will start from this date)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कोरोना महामारीमुळे गेल्या दोनपर्यंत दोनवर्षांपासुन राज्यातील शाळा बंद आहेत. सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. परंतु ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत. सध्या कोरोनाची लाट स्थिरावलेली आहे. अश्या परिस्थितीत राज्यातील शाळा सुरू कराव्यात अशी मागणी जोर धरू लागलेली आहे. या मागणीचा विचार करून सरकारने ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. (Good news for students in rural areas: 8th to 12th schools will start from this date)

सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ज्या गावांमध्ये मागील एक महिन्यांपासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. तसंच भविष्यात ही गावं कोरोनामुक्त राखण्याचा ठराव ग्रामपंचायतीने सर्वानुमते केला जाईल अश्या गावांमध्ये येत्या 15 जुलैपासुन इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यास शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. अशी माहिती शालेय शिक्षणंत्री वर्षा गायकवाड  (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी बुधवारी दुपारी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.(Good news for students in rural areas: 8th to 12th schools will start from this date)

राज्यातील शेवटच्या घटकातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी मिश्रित शिक्षणाचा दृष्टिकोन बाळगणे ही काळाची गरज बनली आहे.ही बाब लक्षात घेऊन दूरस्थ शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षणाला चालना देण्यासोबतच कोरोनामुक्त ग्रामीण भागांत कोरोना प्रतिबंधकतेची संपूर्ण खबरदारी घेऊन 15 जुलै पासून शाळा सुरु करीत आहोत असं ट्विट शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.(Good news for students in rural areas: 8th to 12th schools will start from this date)